न्यूट्रलायझिंग शाम्पू म्हणजे काय ? जाणून घ्या उपयोग आणि फायदे...


आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम शाम्पूची निवड करणे कठीण असते. आजच्या काळात शाम्पूचे अनेक ब्रँड्सचे विविध प्रकारचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर नेहमीच्या शाम्पू व्यतिरिक्त आजकाल तुम्हाला न्यूट्रलायझिंग शाम्पू देखील बाजारात पाहायला मिळतील. या दोन्ही प्रकारच्या शाम्पूची केसांवर काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. चला तर जाणून घेउयात न्यूट्रलाईजिंग शाम्पू म्हणजे काय ? त्याबरोबरच उपयोग आणि फायदे... 

 

न्यूट्रलायझिंग शाम्पू म्हणजे काय? 

न्यूट्रलायझिंग शाम्पू हे अधिक प्रक्रिया केलेले आणि सॅचुरेटेड टाइपचे शाम्पू आहेत. या शाम्पूचे मुख्य काम म्हणजे तुमच्या केसांची पीएच पातळी राखणे होय. तुम्हाला एकापेक्षा जास्त हेअर प्रोडक्ट्स आणि हेअर रिलेक्सर्स वापरण्याची सवय असल्यास, तुम्हाला न्यूट्रलायझिंग शाम्पूची गरज आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही तुमच्या केसांवर केमिकल आधारित विविध उत्पादने वापरता तेव्हा ते तुमच्या केसांच्या पीएच पातळीचे संतुलन  बिघडवते. रिलेक्सर्ससारखी उत्पादने केसांची पीएच पातळी वाढवतात. ठराविक वेळेनंतर पीएच पातळी खाली आणली नाही तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि केस तुटण्याची शक्यता असते.

न्यूट्रलायझिंग शाम्पू का आवश्यक आहे? 

केसांची पीएच पातळी राखण्यासाठी न्यूट्रलायझिंग शाम्पू आवश्यक आहे. खरं तर, जेव्हा तुम्ही रिलॅक्सर्स स्वच्छ पाण्याने आणि नियमित शाम्पूने धुता तेव्हा काही प्रमाणात प्रोडक्ट केसांमध्ये राहते. रिलॅक्सर्समध्ये काही घटक असतात जे नियमित शाम्पू आणि पाण्याने केसांमधून काढणे कठीण असते.

तुमच्या केसांसाठी न्यूट्रलायझिंग शाम्पू चांगले आहे का? 

न्यूट्रलायझिंग शाम्पू केवळ विशिष्ट परिस्थितीतच तुमच्या केसांसाठी चांगला असतो. कारण हा सर्व प्रकारच्या केसांना सूट होणारा सामान्य शाम्पू नाही. या शाम्पूचा वापर तेव्हा करा जेव्हा तुम्ही- 

• केसांवर रीलॅक्सर्स वापरता.

 • वेगवेगळ्या हेअर केअर प्रोडक्ट्ससह केसांवर एक्सपेरीमेंट करता.   

• तुमच्या केसांमध्ये क्षारता जास्त असल्यास या शाम्पूचा वापर करा. 

फायदे 

• तुमच्या केसांचा pH संतुलित ठेवतो. 

• केस तुटण्यापासून प्रतिबंधित करतो. 

• कोरडेपणा दूर करतो.

 • केसांना गुळगुळीत आणि निरोगी ठेवतो.

 • केसांना बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. 

 न्यूट्रलायझिंग शाम्पू कधी वापरायचा? 

 तुमचे केस क्षारीय असतील तरच या शाम्पूचा वापर करणे योग्य आहे. तसेच, या शाम्पूचा वापर कधीही नियमितपणे करू नये, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.


Previous Post Next Post