
मान्सूनमध्ये अनेक मित्रमंडळी फिरायला जाण्याचे प्लॅन करतात. कारण, या वातावरणात झरे, धबधबे आणि नयनरम्य निसर्गात जाण्याची मज्जा काही औरंच असते. जर तुम्ही देखील या मान्सूनमध्ये ट्रिपवर जायचे प्लॅन करत आहात? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी जाऊन तुम्ही मान्सून आणि ट्रिप दोन्हीचा आस्वाद घेऊ शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर ठिकाणांची यादी तयार केली आहे. या ठिकाणी तुम्ही मित्रमंडळी आणि कुटुंबासह जाऊ शकता.
Also Read: लग्नाआधी सोलो ट्रिप प्लॅन करताय? 'हे' भारतीय डेस्टिनेशन्स आहेत उत्तम..
कूर्ग
कर्नाटकमधील कूर्ग हे एक सुंदर हिलस्टेशन आहे, जो मान्सूनमध्ये आणखी नयनरम्य होतो. याला 'कोडगू' किंवा 'भारताचे स्कॉटलँड' देखील म्हणतात. या ठिकाणी दऱ्या, धबधबे, कॉफी गार्डन्स आहेत, जे या ठिकाणांना अधिक सुंदर आणि ताजेतवाने बनवतात.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
उत्तराखंडमध्ये उपस्थित 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' जुलैमध्ये फिरायला जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या ठिकाणी अनेक प्रकारची म्हणजेच 500 हुन अधिक प्रकारची फुले उमलतात. ही सुंदर फुले पाहण्यास जगभरातुन लोक येतात. येथील कमी तापमानामुळे ही जागा पावसाळ्यात आणखी सुंदर होते.
उदयपूर 'झीलो का शहर'
दार्जिलिंग
पश्चिम बंगालमध्ये उपस्थित दार्जिलिंग 'पहाडो की रानी' म्हणून देखील प्रसिद्ध आहे. मान्सूनमध्ये हे ठिकाण हिरव्यागार शालूंनी बाहेरून आणखी आकर्षक होतो. हे ठिकाण चहाच्या बागांसाठी आणि वारसा इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. शांत आणि सांस्कृतिक ठिकाण आवडणाऱ्यांसाठी पर्यटकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.