तणावाची होणार सुट्टी! स्वतःमध्ये फक्त करा '5' बदल, तिसऱ्या दिवशीच मिळेल रिजल्ट

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला स्वतःकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ उरलेला नाही. महिलांचे जीवन तर ऑफीस आणि घर यामध्ये गुरफटून गेले आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचे ताण येणे साहजिकच आहे. प्रत्येक लहान-सहान गोष्टींचे ताण घेण्याची सवय तुम्हाला लागू नये, असे झाल्यास तुमची सतत चिड-चिड होईल. जर तुम्ही तुमचे लाइफस्टाइल आणि आहारामध्ये काही बदल केले तर तणाव कमी करता येईल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला ताण कमी करण्याचे काही सोपे आणि विशेष उपाय सांगणार आहोत.

Also Read: चाळीशीनंतरही ग्लो करेल तुमचा सुंदर चेहरा! घरच्या घरीच 'या' सोप्या गोष्टींनी बनवा नॅचरल फेस टोनर्स

छोटे मिल्स घ्या. 

 संपूर्ण जेवण एकाच वेळी करण्याऐवजी, दिवसातून तीन ते चार वेळा कमी कमी प्रमाणात जेवण करा. हे केवळ तुमची भूक नियंत्रित करत नाही तर जास्त खाण्यापासून देखील प्रतिबंधित करते. यामुळे चयापचय वाढतो आणि उर्जेची पातळी देखील वाढते. हे वजन नियंत्रित करण्यास आणि शरीरात ऊर्जा वाढविण्यास उपयुक्त ठरते. 

व्यायाम आणि योगासन 

आपण सर्वांना माहितीच आहे की, व्यायाम आणि योगासन करणे ताणतणाव कमी करण्याचे एक उत्तम स्रोत आहे. मात्र, सुरुवातीला हेवी एक्सरसाइज करू नका. एवढेच नाही तर, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने व्यायाम आणि योगासन निवडा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम आणि चालत जा. यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. व्यायामामुळे हाडे मजबूत होतात, हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.

चहा आणि कॉफी 

ताणतणाव असताना लोक चहा आणि कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. पण जास्त कॉफी आणि चहा पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. लक्षात ठेवा की, रात्री झोपण्यापूर्वी कॉफी आणि चहा पिऊ नका कारण, त्यात भरपूर कॅफिन असते जे झोपेमध्ये व्यत्यय आणेल. 

सोशलाईज करा. 

वाढते वय आणि जबाबदाऱ्यांसह मित्र मैत्रिणी बनवणे थांबवू नका. नवीन लोकांना भेटणे, मित्र बनवणे आणि बाहेर जाणे सुरु ठेवा. यासह तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहील. नव्या लोकांना भेटत राहिल्यास तुमचे नॉलेज तर वाढेलच आणि तुमचे मूड देखील चांगले राहील. 

पूर्ण झोप घ्या. 

जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर झोपेला तुमचा सर्वात जवळचा मित्र बनवा. रात्री वेळेवर झोपल्याने तुमच्या अर्ध्या समस्या सुटतात. तुम्ही दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. यामुळे तुम्हाला कमी थकवा, कमकुवतपणा आणि तणाव जाणवेल. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत होईल.