International Yoga Day 2025: दररोज केवळ एकच योगासन आणि सर्व आजारांवर येईल नियंत्रण, ओळखा पाहू कोण?

International Yoga Day 2025: आज 21 जून रोजी दरवर्षी देशभरात 'आंतरराष्ट्रीय योग्य दिन' साजरा केला जातो. योगासन केल्याने केवळ आपली शारीरिक फिटनेसच नाही तर, अनेक आजारांवर नियंत्रण देखील मिळतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला संपूर्ण वेळ देऊन योग करणे, शक्य होत नाही. मात्र, तुम्ही केवळ 5 मिनिट वेळ काढून एक योगासन केले तर, तुमचे स्वास्थ्य, फिटनेस आणि आजारांवर नियंत्रण असे अनेक लाभ मिळतील. हा विशेष योगासन म्हणजे 'सूर्यनमस्कार' होय. 

Also Read: फेशियल फॅट कमी करण्यासाठी परिणामकारक एक्सरसाइज

आपण लहानपणीपासून सूर्यनमस्कारबद्दल ऐकत असतो. शाळेत, योग क्लास, डान्स क्लास, फिटनेस क्लासमध्ये सूर्यनमस्कार करणे शिकवले जाते. दिवसातून 5-10 मिनिटे सूर्यनमस्कार पुरेसे आहेत. हा एक संपूर्ण व्यायाम आहे, ज्यामध्ये शरीराचे जवळजवळ प्रत्येक स्नायू आणि अवयव सक्रिय असतात. हे चांगले पचन, हार्मोन बॅलन्स, वजन नियंत्रण आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करेल.

सूर्य नमस्कार 

सूर्यनमस्कार हा एक योग क्रम आहे, ज्यामध्ये 12 योगासने सतत जोडली जातात. यामुळे शरीर ऊर्जावान,  पचनसंस्था, हार्मोन बॅलन्स, रक्ताभिसरण आणि मानसिक शांतीसारखे लाभ मिळतील. दररोज पहाटेला सूर्यनमस्कार करणे, अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला यु-ट्यूबवर सूर्यनमस्कार करण्याच्या योग्य पद्धतींचे व्हीडिओ सहज मिळतील. 

सूर्य नमस्कार करण्याचे फायदे 

- सूर्यनमस्कार नियमितपणे केल्याने शरीराची लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते.

 - सूर्यनमस्कार केल्याने डिटॉक्स प्रक्रिया देखील होते, जी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

- सूर्यनमस्कार पचनसंस्था सक्रिय करतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यासारख्या समस्या नियंत्रणात राहतात.

- सूर्यनमस्कारद्वारे थायरॉईड, महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, PCOD, PCOS सारख्या समस्यांवर नियंत्रण राहते.

- सूर्यनमस्काराने मधुमेह, रक्तदाब, संधिवात आणि एन्झायटी यांसारखे आजार देखील नियंत्रित केले जाऊ शकतात.

Image Credit: pexels, adobe stock 

Previous Post Next Post