भारतात अनेक प्रकारचे सुंदर आणि आकर्षक असे भरतकाम असलेले पोशाख मिळतात. सुरुवातीपासूनच चिकनकारी भरतकाम असेलेले कुर्ती सेट, साड्या, फ्रॉक्स इ. अनेक ड्रेसेस ट्रेंडमध्ये आहेत. चिकनकारी डिझाईन असलेल्या ड्रेससेस अंगावर अतिशय सुंदर दिसतात. होय, भरतकाम विश्वात चिकनकारी हे असे एक नाव आहे, जे अत्यंत लोकप्रिय झाले आहे. चिकनकारी ड्रेसेस अतिशय हलके आणि स्पर्श केल्यास मऊ असे असतात. त्यामुळे चिकनकारी ड्रेसेस कोणत्याही ऋतूत घालण्यास योग्य असतात. मात्र, बरेचदा लोक मशीन भरतकाम आणि खरे म्हणजे हाताने केलेले चिकनकारी भरतकाम यात फरक करू शकत नाहीत.
Also Read: महागड्या साडीवरील जरीकाम खरे आहे की नाही? 'या' सोप्या पद्धतीने सहज पटेल ओळख
चिकनकारीचा इतिहास
मशीन चिकनकारी आणि खरे चिकनकारी वर्कमध्ये एक सूक्ष्म फरक आहे. चिकनकारीचा इतिहास खूप जुना आहे. हे मुघल काळात सुरू झाले असे मानले जाते. चिकनकारी भरतकाम पारंपारिकपणे हाताने केले जाते आणि त्यात गुंतागुंतीचे, फुलांचे आणि भूमितीय डिझाइन्स असतात. लखनऊमध्ये वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून केल्या जाणाऱ्या पारंपारिक भरतकामाला लखनवी भरतकाम असे म्हणतात. यामधून चिकनकारी ही मुख्य शैलींपैकी एक आहे.
हे भरतकाम असलेले ड्रेसेस देशभरात वापरले जातात. केवळ देशभरातच नाही तर, या चिकनकारी ड्रेसेस परदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. मोठंमोठे सेलिब्रिटी देखील चिकनकारी सूट आणि साड्या घालताना दिसतात. हाताने केलेले चिकनकारी वर्क महागडे असते. चला तर मग जास्त वेळ न घालवता खरे चिकनकारी वर्क कसे ओळखावे ते जाणून घेऊयात:
हाताने केले चिकनकारी भरतकाम
खऱ्या चिकनकारीमध्ये भरतकाम हाताने केले जाते, त्यामुळे धागे खूप बारीक असतात. तसेच, मागच्या बाजूने तुम्हाला असमानता स्पष्टपणे दिसते. चिकनकारी हे एक विशेष भरतकाम आहे ज्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या मऊ बारीक धाग्यांनी हाताने भरतकाम केले जाते. यासह, त्यात काही इतर म्यूट कलर्स देखील वापरले जातात. चिकनकारीमध्ये डिझाइन तयार करण्यासाठी अनेक प्रकारचे टाके देखील वापरले जातात. जसे की रनिंग स्टिच, बखिया, फांदा, जाळी इ. सुमारे 34 प्रकारचे टाके आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हाताने केलेले वर्क मागच्या बाजूने खडबडीत दिसते. तर दुसरीकडे, मशीन-निर्मित भरतकाम अधिक स्वच्छ आणि स्पष्ट दिसते, कारण त्याचे टाके घट्ट असतात.
खरेदी करताना 'या' कडे लक्ष द्या.
- चिकनकारी भरतकाम केलेले कपडे खरेदी करताना धाग्यांकडे लक्ष द्या.
- खऱ्या भरतकामाचे धागे मऊ असतात कारण त्यात कापसाचे किंवा रेशमी धागे वापरले जातात. हे धागे मऊ असल्यामुळे सहज तुटत नाहीत, त्यामुळे धुतल्यानंतरही कपड्यांवर भरतकाम राहते.
- फॅब्रिककडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. हलक्या जॉर्जेटवर चिकनकारी भरतकाम असलेले सूट देखील खूप लोकप्रिय आहेत. परंतु, यामध्ये बहुतेक मशीन भरतकाम केले जाते.
- खरी चिकनकारी बहुतेकदा मलमल आणि कॉटन सारख्या हलक्या, मऊ कापडांवर केली जाते. तर, बनावट चिकनकारीमध्ये तुम्हाला कृत्रिम कापड सहज सापडतील.
किंमत
खरे चिकनकारी भरतकाम हाताने केले जाते, यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते. म्हणून खरे चिकनकारी कपडे सहसा महाग असतात. याशिवाय, तुम्हाला बाजारात असेच कपडे खूप स्वस्त किमतीत मिळतील, मात्र, त्यात मशीन वर्क असू शकते.
image credtit: pexels, adobe stock

