क्या है राज...! पन्नाशीमध्येही मलायकाची त्वचा दिसते अगदी तरुण! सांगितले स्किनकेयरचे गुपित

बॉलीवूडमध्ये अजूनही अशा काही ऍक्ट्रेस आहेत, ज्या वयाच्या पन्नाशीमध्ये असल्या तरीही अगदी तरुण दिसतात. त्यांच्या तरुणाईचे रहस्य नक्कीच त्यांचे हेल्दी लाइफस्टाइल, फिटनेस आणि स्किनकेयरकडे लक्ष देणे होय. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, श्वेता तिवारी इ. अनेक अभिनेत्र्या त्यांच्या वयापेक्षा खूप तरुण दिसतात. त्यात बॉलीवूड एव्हरग्रीन ब्युटी मलायका अरोराचे नाव देखील समाविष्ट आहे. मलायका तिच्या आहारापासून ते तिच्या वर्कआउट्स आणि स्टाईलपर्यंत संतुलित दिनचर्या पाळते. अलीकडेच मलायकाने ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर स्किनकेयरबद्दल एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.

Also Read: Hollywood celebrites skincare routine to get glowing and glossy skin

या व्हीडिओमध्ये मलायकाने मेकअप करण्याआधीच्या क्विक स्किनकेयर रुटीनबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेल्या स्किनकेयर स्टेप्स वरून हे दिसून येते की, डेली स्किनकेयर रुटीनमुळे तुम्ही आकर्षक चेहरा कसा मिळवू शकता आणि वाढत्या वयातही चेहरा कसा तेजस्वी ठेवता येतो. तुम्ही देखील हे स्किनकेयर फॉलो करून तुमची त्वचा दीर्घकाळापर्यंत तरुण ठेऊ शकता. जाणून घेऊयात स्टेप्स-  

फेशियल ऑइल 

सर्वप्रथम मलायका फेशियल ऑइल लावते, जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे. हे केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर, नैसर्गिक ग्लो देखील राखते. यासाठी तुम्ही रोज, ग्रेप ऑइल आणि सनफ्लॉवर सीड्स ऑइल  यांसारखे नॉन-कॉमेडोजेनिक ऑइल देखील वापरू शकता. हे ओलीस तुमच्या त्वचेचे छिद्र बंद करत नाहीत. तेल लावण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. 

जेड रोलर गुआ शा फेशियल मसाज

व्हीडिओमध्ये मलायकाने तेल लावल्यानंतर चेहऱ्यावर जेड रोलरने डोळ्यांखाली मसाज केला आणि नंतर गुआ शा फेशियल मसाज केला. या मसाज त्वचेतील रक्ताभिसरण वाढवण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात. तुम्ही तुमच्या स्किनकेयरमध्ये जेड रोलर आणि गुआ-शा समाविष्ट करू शकता. लक्षात घ्या की, तुम्ही ते चांगल्या ब्रँडकडून खरेदी करावे आणि ते योग्यरित्या वापरावे. 

अंडर आय पॅच 

वरील मसाज केल्यानंतर व्हीडिओमध्ये मलायका डोळ्यांखालील पॅचेस लावते. हे पॅचेस डार्क सर्कल्स रोखण्यासाठी प्रभावी आहेत. डार्क सर्कल्स जास्त असल्यास आय पॅच समाविष्ट करणे, हा एक चांगला पर्याय आहे. हे तुमच्या डोळ्यांखालील भागाला हायड्रेट करते आणि फॅट्स पॉकेट्स सुरक्षित ठेवते. यात बारीक रेषा, काळेपणा आणि डोळ्यांखालील खड्डे यासारख्या समस्या टाळता येतात.

मानेला मॉइश्चराइज करणे. 

या रुटीनमध्ये मलायकाने केवळ चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतली नाही, तर तिने तिच्या मानेवर देखील मॉइश्चरायझर देखील लावले आहे. मानेकडे बहुतेक लोक सहसा दुर्लक्ष करतात, नेकलाईनकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. 

हायड्रेशनसाठी लीप बाम 

मलायकाने स्किनकेयर रुटीनमध्ये पौष्टिक लिप बामने देखील दिनचर्या पूर्ण केली आहे. लीप बाम लिपस्टिकला मऊ लूक तर देतेच आणि ओठांच्या नाजूक त्वचेला हायड्रेट देखील ठेवते. तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये SPF असलेला लिप बाम वापरू शकता, जो ओठांच्या त्वचेला अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून देखील वाचवतो.