घरच्या घरी ब्लॅक हेड्स रिमूव्हलसाठी याहून सोपे उपाय मिळणे अशक्य, पहिल्याच वेळी मिळेल जबरदस्त रिजल्ट


तुमचा सुंदर चेहरा कायम सुंदर आणि त्वचा स्वस्थ राहावी म्हणून तुम्हाला स्किनकेअर करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, चेहऱ्यावर साचलेली घाण पोअर्सना ब्लॉक करते. त्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅक हेड्सची समस्या मोठ्या प्रमाणात तयार होते. तुम्हाला माहितीच आहे की, कधीकधी हट्टी ब्लॅक हेड्स काढणे कठीण असते. 

ब्लॅकहेड्स कसे तयार होतात? 

तुमच्या त्वचेवरील केसांच्या फोलिकल्सची वाढ न झाल्यामुळे ब्लॅकहेड्स होतात. या पोअर्समध्ये घाण साचल्यामुळे ते काळे दिसू लागतात. जर ब्लॅकहेड्स सौम्य असतील तर ते मुरुमांना देखील कारणीभूत ठरू शकतात. ब्लॅकहेड्स काढणे खूप वेदनादायक असते. तुम्ही तुमच्या ब्युटी एक्स्पर्टकडे जाऊन ब्लॅकहेड्स रिमूव्ह करू शकता. पण, यासाठी तुम्हाला अधिकाधिक खर्च करावा लागेल. अशा परिस्थितीत, काही प्रभावी घरगुती उपाय वापरून तुम्ही चेहऱ्यावरील जिद्दी ब्लॅकहेड्स रिमूव्ह करू शकता.

चेहरा स्वच्छ करणे. 

ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी, तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी साबणाने किंवा फेसवॉशने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. आठवड्यातून दोन ते तीन दिवस तुमचा चेहरा स्क्रब करा. यामुळे ब्लॅकहेड्स कमी होतील.


ओटमील स्क्रब 

ओटमीलने चेहऱ्यावर स्क्रब केल्याने ब्लॅकहेड्स देखील दूर होतात. यासाठी ओटमील पाण्यात मिसळा. ते चेहऱ्यावर स्क्रब म्हणून लावल्याने ब्लॅकहेड्स कमी होतात. स्मुथली हे चेहऱ्यावर रब करा आणि चेहरा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर फेस मॉइश्चराइज करून घ्या.
 

कोरफळ आणि टमाटर 

टोमॅटो ब्लॅकहेड्स स्वच्छ करण्यासाठी देखील प्रभावी आहे. टोमॅटोचा लगदा दररोज ब्लॅकहेड्सवर लावा. यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा चेहरा ग्लो करेल. कोरफड जेल देखील पोअर्समधील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि ब्लॅकहेड्स रिमूव्ह करण्यासाठी उपयुक्त आहे. 


लिंबूचे रस 

ब्लॅकहेड्स स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस हा एक अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, ते लावल्याने ब्लॅकहेड्स फुगतात आणि चोळल्यावर स्वच्छ होतात. यामुळे ब्लॅकहेड्स हळूहळू सहज कमी होतात. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून लावल्याने त्वचेच्या मृत पेशी आणि ब्लॅकहेड्स कमी होतात.

डिस्क्लेमर: वरील माहिती केवळ तुमच्या सामान्य ज्ञानाकरिता आहे. जर तुम्हाला या माहितीचा अवलंब दैनंदिन जीवनात करायचा असेल तर आधी तुमच्या एक्स्पर्टकडून सल्ला नक्की घ्या.