भारतातील महिलांचा पारंपरिक पेहराव म्हणजे साडी होय. साडी फक्त पेहरावच नाही तर प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रत्येक भारतीय घरातील नववधू नव्याची नवलाई म्हणून लग्नाच्या सुरुवातीचे दिवस सुंदर आणि पारंपरिक साड्या परिधान करते. भारतात साड्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रांतामध्ये निरनिराळे साड्यांचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला प्रसिद्ध कांजीवरम साडीबद्दल माहिती देणार आहोत.
कांजीवरम साडीचा इतिहास
कांजीवरम साडी ही बेंगलोरजवळ स्थित कांची नावाच्या छोट्याश्या खेडेगावतील विणकरांची अप्रतिम कलाकृती आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, कांची नावाच्या गावात ही साडी तयार होत असल्यामुळे तिलाकांचीपुरम साडी, असे देखील म्हटले जाते. या साड्या बनवण्यासाठी अत्यंत तल्लम आणि उंच प्रतिचे सिल्क (रेशमी कापड) वापरले जाते. या साड्या विशेषतः गडद रंग आणि डिझाईनच्या असतात.
Also Read: महागड्या साडीवरील जरीकाम खरे आहे की नाही? 'या' सोप्या पद्धतीने सहज पटेल ओळख
विशेष प्रकारचे डिझाईन्स
कांजीवरम साड्यांवर आकर्षक असे जरीकाम देखील केले जाते. या साडीवरील डिझाईन्स विशेष प्रकारचे असतात. होय, अनेकदा साड्यांवर पल्लव मंदिरे, राजवाडे, चित्रे यांपासून प्रेरित डिझाइन्स असतात. महत्त्वाचे लक्षात घ्या की, कांजीवरम साडी तयार करायला 10 ते 12 दिवसांचा अवधी लागतो. एवढेच नाही तर, विशेष डिझाईन असणारी साडी तयार करायला तब्बल 20-25 दिवसांचा अवधी लागतो.
वरील सर्व विशेषतांमुळे या साडीची किंमत साधरणतः 2000- 50,000 रुपयांपर्यंत असते. कांजीवरम साडीची किंमत त्यावर केलेल्या जरीकामावरून ठरवली जाते.
कांजीवरम साडीचे महत्त्व
कांजीवरम साड्या पारंपारिक दक्षिण भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानल्या जातात. लग्न, धार्मिक समारंभ आणि इतर शुभ प्रसंगी त्या अविभाज्य भाग आहेत. या साड्या त्यांच्या टिकाऊपणा आणि दीर्घायुष्यासाठी ओळखल्या जातात. एवढेच नाही तर, अनेक कुटुंबे त्यांच्या कांजीवरम साड्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वारसा म्हणून देखील हस्तांतरित करतात. यामध्ये सोन्याच्या धाग्यांचे जरीकाम असल्यामुळे ही साडी अनेकांसाठी पूर्वजांची मौल्यवान संपत्ती असते.
image credit: adobe stock

