छोट्या उंचीच्या मुलींना अगदी लहानपणीपासून उंचीमुळे सर्व चिडवतात आणि मजा घेत असतात. साधारणपणे महिलांना उंच, सडपातळ आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते. त्यामुळे, विशेषतः छोट्या उंचीच्या मुली नेहमी मोठ्या हिल्ससह आपले लुक स्टाईल करतात. मात्र, मोठ्या हिल्समुळे काही वेळानंतर पायाला त्रास होणे, सुरु होते. त्यामुळे काही महिला हिल्स घालणे टाळतात. अशा परिस्थितीत, या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यसाठी हिल्सशिवाय लुक स्टाईल करण्यासाठी काही महत्त्वाच्या फॅशन टिप्स घेऊन आलो आहोत. पाहुयात हिल्सशिवाय उंच लुक कसा स्टाईल करता येईल.
Also Read: केवळ बांधणीच नाही तर राजस्थानचे 'हे' प्रिंट देखील आहेत प्रसिद्ध, सुंदर आणि आकर्षक
मोनोक्रोम लुक
| image credit: reddit |
उंच दिसण्यासाठी 'मोनोक्रोम लूक' एक सर्वोत्तम पर्याय आणि कल्पना आहे. मोनोक्रोम लूक म्हणजे संपूर्ण पोशाख एकाच रंगाचा असायला हवा. जेव्हा तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाचे कपडे घालता, तेव्हा तुमचे शरीर काही प्रमाणात उंच दिसते. मोनोक्रोम लूक एक नैसर्गिक प्रवाह निर्माण करतो, ज्यामुळे उंची दृश्यमानपणे जास्त दिसते. लक्षात घ्या की, या युक्तीसाठी न्यूट्रल टोन, पांढरा किंवा काळा सर्वोत्तम आहेत.
लॉन्ग किंवा स्ट्रेट फिट कुर्ती
| image credit: reddit |
लॉन्ग कुर्ती केवळ ट्रेडिशनल किंवा इथनिक लूक देत नाहीत, तर उंची देखील वाढवतात. विशेषतः जेव्हा तुम्ही ते स्ट्रेट पँट किंवा पलाझोसह स्टाईल करता, तेव्हा संपूर्ण लूक आणखी आकर्षक दिसतो. यासह, तुम्ही स्ट्रेट फिट कुर्ती निवडू शकता, यामुळे तुमची उंची देखील उंच दृश्यमान होईल.
व्हर्टिकल स्ट्रिप्स डिझाईन
जर तुमची उंची लहान असेल तर, तुम्ही आडवी प्रिंट असलेल्या डिझाईनची कृती किंवा ड्रेस खरेदी करणे टाळावे. नेहमी व्हर्टिकल स्ट्रिप्स डिझाईनसह येणारी कुर्ती खरेदी करा. याचे कारण उभ्या रेषा असलेले कपडे डोळे वर आणि खाली हलवतात, ज्यामुळे शरीर सडपातळ आणि उंच दिसतो.
हाय वेस्ट जीन्स
तुम्ही वेस्टर्न ड्रेसवर देखील तुमचा हायटेड लुक तयार करू शकता. सध्या हाय वेस्ट जीन्स आणि पॅन्ट खूप ट्रेंडमध्ये चालत आहेत. हे केवळ ट्रेंडी नाहीत तर तुम्हाला उंच दिसण्यास देखील मदत करतील. हाय वेस्ट बॉटम्स पाय लांब दिसण्यास मदत करतात. हे तुमच्या एकूण लूकमध्ये उंचीचा भ्रम निर्माण करतात, ज्यामुळे तुमची कंबर उंच दिसते. ते क्रॉप टॉप किंवा इन-शर्टसह स्टाईल करा, जेणेकरून फिगर संतुलित राहील.
Image credit: gettyimages

