छोटे डोळे मोठे दिसण्यासाठी 'अशा'प्रकारे करा आय मेकअप, जाणून घ्या आकर्षक टिप्स


"तुझे डोळे किती सुंदर आहेत?, तुझे डोळे किती बोलके आहेत?, काजल लावल्यावर तुझे डोळे अधिकच आकर्षक दिसतात." अशा अनेक प्रतिक्रिया तुम्ही नेहमीच ऐकत असाल. आकर्षक डोळे तुमच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पाडतात. एवढेच नाही तर, तुमच्या डोळे तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका निभावतात. मेकअप करताना मुली आय मेकअपकडे आवर्जून लक्ष देतात. डोळे हायलाईट झाले की चेहरा सुंदर दिसतो. काही मुलींचे डोळे लहान असतात, त्यापासून त्यांना तक्रार असते. तुम्हाला देखील अशीच तक्रार असेल तर, अजिबात काळजी करू नका. 


या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही मेकअप हॅक्स घेऊन आलो आहोत. याच्या मदतीने तुम्ही तुमचे डोळे मोठे, सुंदर आणि चांगल्या शेपचे बनवू शकता. टिप्स पुढीलप्रमाणे:

डार्क ब्राऊन आयशॅडो बेस बनवा. 

आय मेकअपमध्ये डोळे मोठे दिसण्यात आयशॅडो महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा तुम्ही आय मेकअप करता तेव्हा प्रथम डोळ्यांवर डार्क ब्राऊन आयशॅडोचा थर लावून मिक्स करा. यानंतर कन्सीलर लावा आणि तुमच्या पोशाखानुसार आयशॅडोचा रंग निवडा.

व्हाईट काजळ

जवळपास सर्व महिलांना डोळ्यांना काजल लावण्याची सवय असते. पण जर तुमचे डोळे लहान असतील तर तुम्ही काळ्या काजळऐवजी पांढरे काजळ वापरावे. यामुळे खालची रेषा थोडी रुंद दिसते आणि डोळे मोठे दिसतात. आजकाल बाजारात विविध रंगाचे काजळ उपलब्ध आहेत. 

अशाप्रकारे आयलायनर लावा. 

आयमेकपमध्ये डोळ्यांना आकार देण्यासाठी आयलायनर सर्वात महत्वाचे आहे. विंग्ड ते कॅट आय पर्यंत आयलायनर लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण जर तुम्ही हुड असलेल्या (छोट्या डोळ्यांवर) डोळ्यांवर लाइनर लावत असाल तर, त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे फ्लोटिंग आयलायनर होय. यामध्ये, अप्पर लाइन तसेच आय लिडवर लायनरचे शेप द्यावे लागेल. यासह तुमच्या डोळ्यांचा आकार मोठा दिसेल. 

आयब्रो डिफाइन करा. 

डोळे मोठे दिसण्यासाठी तुमच्या भुवया म्हणजेच आयब्रो डिफाइन करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी, एक कन्सीलर घ्या आणि भुवया डिफाइन करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात लावा. यानंतर, आयब्रोवर ब्लॅक किंवा ब्राऊन शेड अप्लाय करा. यामुळे डोळे आणि भुवया यांच्यातील अंतर दिसून येते आणि डोळे मोठे दिसतात.

आय लॅशेस 

डोळे मोठे दिसण्यासाठी पापण्यांना व्हॉल्यूम देणे देखील महत्वाचे आहे. यासाठी, त्यांना लॅश कर्लरने कर्ल करा आणि नंतर जेल लावा. त्यानंतरच त्यावर मस्कारा अप्लाय करा. डोळे मोठे दिसण्यासाठी शाईनी कलर्सचा वापर करा.

डिस्क्लेमर: वरील टिप्सचा अवलंब करण्याआधी तुम्ही एक्सपर्ट्सचा सल्ला घ्यावा.