बुटके नख वाढवण्यासाठी अगदी सोपे नैसर्गिक उपाय, नेल आर्ट करण्यासाठी एक्सटेंशनची गरज नाही


महिला आणि मुली हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेहमी अनेक प्रकारचे उपाय वापरत असतात. हात मुलायम आणि सुंदर दिसावेत म्हणून नानाप्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स देखील वापरतात. मात्र, हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुमच्या नखांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. लांब आणि सुंदर नेलपेंटने सजवलेली नखे तुमच्या हातांचे सौंदर्य द्विगुणित करतात. परंतु, काही मुलींना नखे खायची सवय असते किंवा काही मुलींची नखे बुटकी असतात. त्यामुळे काही मुलींना सुंदर आणि लांब नखांच्या सौंदर्यापासून वंचित राहावे लागते.


तर, बुटकी नखे असलेल्या मुली बरेचदा नेल एक्सटेंशन देखील वापरतात. मात्र, यामुळे नखांची स्थिती बिघडते, ज्यामुळे नखांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. जर तुम्हालाही नेल एक्सटेंशन घ्यायचे नसेल आणि तुमचे नखे नैसर्गिकरित्या वाढवायचे असतील, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची नखे नैसर्गिकरित्या वाढवू शकता. 

लिंबाचा रस (Lemon juice) 

लिंबाचा रस नखे वाढवण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन C नखांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला दररोज सुमारे 5 मिनिटे नखांवर लिंबू चोळावा लागेल. त्यानंतर, त्यांना कोमट पाण्यामध्ये धुवून घ्या. यामुळे नखे स्वच्छ होतील, त्यांना बॅक्टेरियापासून संरक्षण मिळेल आणि त्यांची वाढ देखील वेगाने होईल.


खोबरेल तेल (Coconut oil)

नारळाच्या तेलात व्हिटॅमिन E चे गुणधर्म आढळतात. खोबरेल तेलात अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात असतात. नखानवे तेल लावल्याने नखे जलद वाढतात. सर्वप्रथम रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला नखांवर नारळाचे तेल लावावे लागेल. काही दिवसांत तुम्हाला आपोआप फरक दिसेल. 

संत्री (Orange)

संत्र्याचा रस लावल्याने नखांची वाढ जलद होते. लिंबूप्रमाणे संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C आढळते, ते कोलेजन वाढवण्यास देखील मदत करते. लक्षात घ्या की, जर तुमच्याकडे कोलेजनची कमतरता नसेल तर नखे देखील जलद वाढतील. यासाठी तुम्हाला संत्र्याचा रस काढावा लागेल आणि तो एका भांड्यात ठेवावा लागेल. त्यात तुमचे हात 10 मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा.


ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)

ऑलिव्ह ऑइल केसांसाठी लाभदायी असल्याचे प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? ऑलिव्ह ऑइल नखांसाठी देखील फायदेशीर आहे. ते केवळ नखे वाढवतेच असे नाही तर, त्यांना मजबूत देखील करते. आधी तुम्हाला ऑलिव्ह ऑइल कोमट गरम करावे लागेल आणि ते नखांवर लावावे लागेल. यानंतर हातमोजे घालून रात्रभर असेच राहू द्या. यामुळे रक्ताभिसरण वाढेल, संपूर्ण कालावधीत तेल नखांच्या आत खोलवर जाऊन, त्यांना मजबूत बनवेल. 

डिस्क्लेमर: वरील टिप्सचा अवलंब करण्यासाढी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. 

image credit: pexels