उन्हाळ्यात केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर, तुमच्या त्वचेवर देखील चांगलाच परिणाम होतो. कडक उन्हात बाहेर गेल्यावर उष्णतेमुळे त्वचा कोरडी होते. तुम्ही मॉइश्चराइजर किंवा लोशन वापरून त्वचेचे रक्षण करू शकता. पण शरीराच्या एका महत्त्वाच्या आणि नाजूक अंगाकडे आपण दुर्लक्ष करतो, ते म्हणजे आपले नखं होत. खरं तर, आपले नखं खूप नाजूक असतात, त्यांवर ऊन आणि धूळच प्रभाव अधिक होतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात उन्हाळ्यात आपल्या नखांची काळजी कशी घ्यावी?
Also Read: तणावाची होणार सुट्टी! स्वतःमध्ये फक्त करा '5' बदल, तिसऱ्या दिवशीच मिळेल रिजल्ट
नखांना मॉइश्चराइज ठेवा.
अनेकदा लोकांना असं वाटते की, उन्हाळ्यात बॉडी लोशन किंवा मॉइश्चराइजरची गरज नसते. लक्षात घ्या की, हा एक गोड गैरसमज आहे, कारण नखे उन्हाळ्यात कोरडी होतात. अशा वेळी तुम्ही नियमितपणे मॉइश्चराझरचा वापर करावा. याला विशेषकरून नखांवर अप्लाय करा, जेणेकरून क्युटिकल्स उत्तमरीत्या मॉइश्चराइज होतील. नखांना मॉइश्चराइज न केल्यास आजूबाजूची त्वचा ड्राय होईल आणि नखे कमकुवत होऊ शकतात.
नखांची स्वच्छता
बरेचदा आपण हात धुतो तेव्हा तळहात आणि तळहाताच्या मागील बाजूची त्वचा खूप चांगली स्वच्छ करतो. परंतु अनेकदा आपण नखांची स्वच्छता करायला विसरतो. यामुळे नखांमध्ये घाण साचते, ज्यामुळे ते कमकुवत होण्याची भीती असते. म्हणून, हात धुताना नखे स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या. दिवसातून किमान एकदा काही क्षण मऊ ब्रशने नखे हळूवारपणे स्वच्छ करावी.
नियमित ट्रिमिंग
जर तुम्ही नखांची ट्रिमिंग आणि त्यांना सेट नाही केले तर, ते कमकुवत होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी नखे ट्रिम किंवा सेट करणे आवश्यक आहे. लांब किंवा मोठ्या नखांमध्ये घाण साचायची भीती असते, ज्यामुळे वास आणि फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे नियमित ट्रिमिंग करणे गरजेचे आहे.
उन्हापासून नखांचे संरक्षण कसे करावे?
जर तुम्ही बाहेर काम करता तेव्हा नखांवर सूर्य किरणांचा परिणाम होतो, त्यामुळे त्वचेसह नखांचे देखील उन्हापासून संरक्षण करा. यासाठी तुम्हाला नखांवर SPF आधारित ट्रान्सपरंट नेलपॉलिशचा टॉप कोट लावाव लागेल. आजकाल बाजारात SPF असलेली नेलपॉलिश सहज उपलब्ध आहे, जी लावल्यावर सूर्यकिरणांपासून तुमच्या नखांचे रक्षण होईल.
image cradit: pexels.


