Fashion Tips: तुमच्या स्किन टोननुसार कपडे कसे निवडावे? तुमच्या परफेक्ट लुकसाठी अगदी महत्त्वाच्या टिप्स
आपल्या परफेक्ट लुकसाठी स्किन टोननुसार कपडे घालणे, अगदी महत्त्वाचे आहे. अनेकदा तुम्ही ऐकलेच असेल की, तुमच्या स्किन टोननुसार कपडे निवडावे, ज्यामुळे ते आकर्षक दिसतील. पण, असे का म्हटले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. एवढेच नाही तर, तुमचा स्किन टोन काय? हे कसे ओळखावे, याबद्दल देखील आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कारण अजूनही अनेकांना त्यांच्या खरा स्किन टोन कोणता ते माहिती नाही.
Also Read: अवघ्या 15 मिनिटांचे स्किनकेयर आणि ब्युटी रुटीन! वर्किंग वूमनसाठी सर्वोत्तम पर्याय
स्किन टोननुसार कपडे का घालावेत?
खरं तर, त्वचेच्या रंगानुसार म्हणजे स्किन टोननुसार कपडे घालणे तुमच्या लुकसाठी चांगले आहे, पण ते अनिवार्य नाही. परंतु, स्किन टोननुसार कपडे घातल्याने तुमचा चेहरा अधिक फ्रेश आणि आकर्षक दिसेल. योग्य रंगाचा पोशाख तुमचा संपूर्ण लूक बॅलन्स ठेवण्यास उपयुक्त आहे. तसेच, तुमचे व्यक्तिमत्व चारचौघात आणखी उठून दिसेल.
स्किन टोन कसे ओळखावे?
स्किन टोनचे तीन प्रकार आहेत. तुमच्या त्वचेचा रंग (स्किन टोन) ओळखण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मनगटावरील नसा पहाव्या लागतील. वॉर्म स्किन टोन असलेल्या लोकांच्या मनगटावर हिरव्या रंगाच्या नसा असतात. जर तुमच्या नसा निळ्या किंवा जांभळ्या दिसत असतील तर, तुमचा स्किन टोन कूल असतो. ज्या लोकांच्या मनगटाच्या नसा हिरव्या आणि निळ्या दोन्ही दिसतात, याचा अर्थ असा की तुम्ही न्यूट्रल स्किन टोनमध्ये मोडता.
| cool skin tone |
कूल स्किन टोननुसार पोशाख: जर तुमचा स्किन टोन कूल असेल तर, निळा, गुलाबी, जांभळा, चांदी, राखाडी इ. रंगाचे कपडे तुम्हाला खूप शोभतील. कूल स्किन टोन असलेल्या लोकांनी खूप चमकदार रंगाचे कपडे टाळावेत.
| warm skin tone |
वॉर्म स्किन टोननुसार पोशाख: जर तुमचा स्किन टोन वॉर्म असेल तर, ऑलिव्ह, मरून, तपकिरी, सोनेरी, पीच रंग तुमच्यावर उठून दिसतील. जर तुम्हाला तुमचा लूक वाईट दिसू नये असे वाटत असेल तर, लाईट कलरपासून दूर रहा, फिकट रंग तुमचा लूक खराब करतील.