Navratri 2025: आह... काय भारी दिसतेस! महाअष्टमीला 'या' आऊटफिट्स आणि ज्वेलरीसह तयार करा हटके बंगाली लुक
सध्या जिकडे तिकडे दुर्गा पूजा नवरात्रीचा जल्लोष सुरु आहे. दररोज गरबा, दांडिया सारख्या नृत्यांद्वारे भक्तगण आपल्या देवीची आराधना करतात. यामध्ये महिला आपली संस्कृती आणि पारंपरिक पोशाख परिधान करतात. परवा म्हणजेच 30 सप्टेंबरला महाअष्टमी साजरी केली जाणार आहे. दुर्गा पूजेला बंगालमध्ये अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे अधिकतर या सणाला महिला आणि मुली बंगाली लुक क्रिएट करतात किंवा अशी काही मंडळे असतात, ज्यात बंगाली थीम देखील असते. जर तुमची देखील बंगाली लुक क्रिएट करण्याची इच्छा असेल तर, तुम्ही या महाअष्टमीला करू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला बंगाली लुक साठी काही ऊटफिट्स आणि ज्वेलरीच्या भन्नाट आयडीयाज देणार आहोत.
साड्यांची निवड आणि ड्रेपिंग पद्धत
दुर्गापूजेदरम्यान, बंगाली लूक करण्यासाठी योग्य रंगाची साडी निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पारंपारिकी लाल बॉर्डर असेलेली साडी एक चांगली निवड ठरू शकते. शिवाय लाल पल्लू आणि बॉर्डर असलेली पांढरी साडी देखील सुंदर दिसेल. या रंगाची साडी दुर्गापूजेदरम्यान घालायला हवी कारण लाल रंग शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. तर, श्वेत रंग पवित्रता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुम्ही अशा कलर कॉम्बिनेशनसह बनारसी साडी देखील घालू शकता.
बंगाली लूक तयार करण्यासाठी त्या पद्धतीने साडी ड्रेप करणे आवश्यक आहे. तुम्ही बंगाली पद्धतीने साडी कशी नेसू शकता, याचे अनेक व्हीडिओ तुम्हाला यु ट्यूबवर मिळतील. खास टीप म्हणजे लूक पूर्ण करण्यासाठी पल्लूमध्ये अंगठ्यांसारखे ऍक्सेसरीज घालून घ्या.
ज्वेलरी
पारंपारिक बंगाली लूकसाठी पारंपारिक दागिन्यांची निवड करणे आवश्यक आहे. तुम्ही सोनेरी चोकर, स्टॅक्ड केलेला नेकलेस किंवा जाडसर बांगड्या देखील घालू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, बंगालमधील विवाहित महिला शका पोला घालतात. म्हणून जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या लूकमध्ये ते सामील करण्याचा प्रयत्न करा. यासह एक स्टेटमेंट नोज रिंग तुमचा बंगाली लूक पूर्ण करेल.
तुम्हाला पारंपरिक दागिने घालायला आवडत नसतील तर, ऑक्सिडाईझ्ड ज्वेलरी ट्राय करा. यामुळे तुमच्या लूकला आधुनिक स्पर्श मिळेल.
मेकअप
बंगाली मेकअपसाठी तुम्ही डोळे हायलाइट करण्यावर लक्ष केंद्रित करा. हमखास काजळ तर लावाच पण त्यासह विंग्ड लाइनर तुमच्या लुकला परिपूर्णता देईल. त्याबरोबरच, लाल आणि सोनेरी आयशॅडो निवडा, कपाळावर लाल बिंदी आणि लाल लिपस्टिक लावून तुमचा बंगाली लूक पूर्ण करा. मात्र, जर तुम्हाला लाल रंगाची लिपस्टिक आवडत नसेल तर, तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार लिपस्टिक शेड निवडू शकता.
Also Read: केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी 'या' सुंदर दागिन्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?...
हेयर स्टाईल
बंगालील लुकसाठी तुम्ही एक साधा पण आकर्षक असा अंबाडा बनवू शकता जो सुंदर दिसेल. तसेच, तुम्ही तुमचे केस पुढच्या बाजूने वेगळे करून एक वळण तयार करू शकता आणि ते मागे पिन करू शकता. हे केस तुम्हाला नंतर अंबाडामध्ये अटॅच करता येतील. तुम्ही हा अंबाडा हेयर ऍक्सेसरीज किंवा फुलांनी सजवू शकता. तुमचा चेहरा फ्रेम करण्यासाठी कपाळाजवळ केसांच्या बटा देखील सोडता येतील. अशाप्रकारे तुमचा आकर्षक बंगाली लुक रेडी होईल.
image credit: pexels.com