तुमच्या सुंदर स्मित-हास्याने तुम्ही नेहमीच हजारो जणांना घायाळ करत असाल यात शंकाच नाही. तुमच्या एका गोड स्माईलमुळे तुमचा स्वभाव पुढील व्यक्तीला समजतो. पण जर तुम्हालाही दात दिसताना स्माईल करण्याची सवय असेल तर, मात्र तुमचे दात सुद्धा तितकेच सुंदर असायला हवेत. सध्या धावपळीच्या जीवनामुळे आपण या छोट्या- छोट्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करतो. त्यामुळे सध्या अनेकांना दात पिवळे होण्याची तक्रार असते. कितीही महागडी टूथपेस्ट वापरा, ही तक्रार सहसा लवकर जात नाही.
अखेर कंटाळून तुम्हाला डेंटिस्टकडे जाण्याचे निर्णय घ्यावे लागते. तुम्ही सुद्धा या स्तरावर असाल तर, एकदा हे घरगुती उपाय करून बघा. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला पिवळे दात पांढरे-शुभ्र करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात आज्जीच्या बटव्यातील काही खास उपाय-
कडूलिंबाची पाने
आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या पानांचे औषधीय गुणधर्म सांगण्यात आले आहेत. होय, प्राचीन काळापासून कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी वरदान मानली जातात. कडुलिंबाची पाने जितकी कडू चवीची असतात, तितकीच ती आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पिवळे दात शुभ्र करण्यासाठी कडुलिंबाची पाने चावल्याने दातांवरील पिवळेपणा आणि घाण दूर होण्यास मदत होते. म्हणूनच औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले कडुलिंबाच्या काडीचे टूथब्रश म्हणून प्राचीन काळातील लोक वापर करत होते.
पेरूची पाने
क्वचितच लोकांना हे माहिती असेल की, पेरूची पाने तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायी असतात. होय, पिवळे दात दूर करण्यासाठी तुम्ही पेरूच्या पानांचा वापर करू शकता. दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पेरूची पाने चावा. पेरूच्या पानांमधील पोषक तत्वे तुमचे दात स्वच्छ करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. तसेच, दात दुखत असताना पेरूची पाने थोड्या मीठासोबत उकळून दुखत असलेल्या दातावर काही वेळांसाठी ठेवा. काही दिवस हा उपाय केल्याने दातदुखी बंद होईल.
पुदिना
सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी पुदिन्याची पाने चावल्याने तुमच्या दातांचा पांढरापणा परत येऊ शकतो. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले घटक तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर, तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर देखील करू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, संत्र्याच्या सालीला दातांवर घासून त्यावरील घाण आणि पिवळेपणा कमी करता येतो.
डिस्क्लेमर: वरील माहिती तुमच्या सामान्य ज्ञानकरिता आहे. तुम्हाला या माहितीचा वापर दैनंदिन जीवनात करायचा असेल तर, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा एक्सपर्ट्सचा सल्ला नक्की घ्यावा.
image credit: pexels, getty images