एकाच रात्रीत मिळेल ग्लोइंग स्किन? हे घरगुती फेस पॅक करतील कमाल


सुंदर आणि उजळलेला चेहरा कुणाला नको असतो? पण आजच्या लाइफस्टाइल, वाढते तणाव, योग्य-अयोग्य वेळी आहार घेतल्यामुळे तुम्हाला हवं तसा सुंदर चेहरा मिळवणे, एक स्वप्नचं राहून जातं. त्यातच आता लग्नसराई आणि कार्यक्रमांचे हंगाम सुरु झाले आहे. अशात सर्व मुली आणि महिलांना वाटते की, कार्यक्रमांदरम्यान आपण सुंदर दिसावे. पण यासाठी तुम्हाला कुठलेही रासायनिक उत्पादन वापरण्याची गरज नाही. तुम्ही घरगुती फेस पॅक बनवून देखील एका रात्रीत ग्लोइंग स्किन मिळवू शकता. 


होय, जर तुमच्याकडे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्हाला अशा फेस पॅकची आवश्यकता आहे जो त्वरित काम करेल. केमिकल्सशिवाय तुमची त्वचा चमकदार आणि फ्रेश बनवेल. या लेखात आम्ही तुमच्यासाठी स्पेशल फेस पॅकबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात एकाच रात्रीत कमाल दाखवणारे घरगुती फेस पॅक- 

चंदन फेस पॅक 

चंदन गुलाबजल फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला चंदन पावडर, हळदी आणि गुलाबजल किंवा दुधाची गरज आहे. प्रथम, सर्व 1 चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गुलाबजल किंवा दूध घ्या. हे सर्व घटक एकत्र करून पेस्ट तयार करा. तुम्ही थिकनेसनुसार हवे तसे दूध किंवा गुलाबपाणी वापरू शकता. ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. आता 15 मिनिटांनंतर तुम्ही चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा आणि स्वच्छ धुवून घ्या. 

चंदन त्वचेला आराम देतो, हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि दूध त्वचेला मॉइश्चरायझ करतो. अशाप्रकारे तुमची त्वचा चमकदार बनवण्यास हा फेस पॅक आवश्यक आहे. 

काकडी फेस पॅक 

काकडीचा फेस पार्क बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे काकडीचा रस, एक चमचा एलो वेरा जेल आणि एक चमचा बेसन लागेल. लक्षात घ्या की, या फेसपॅकमध्ये बेसन पूर्णपणे पर्यायी आहे. फेस पॅक तयार करण्यासाठी सर्व साहित्य मिसळा आणि ते चेहऱ्यावर आणि मानेला लावा. ते सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 

लक्षात घ्या की, काकडी स्किन टाइटनिंग आणि फ्रेशनेससाठी उपयुक्त आहे. एलो-वेरा तुमच्या त्वचेची सूज आणि डलनेस कमी करतो. तसेच, बेसन डेड स्किन हटवण्यासाठी उपयुक्त आहे. अशाप्रकारे, हा घरगुती फेस पॅक तुमची त्वचा उजळण्यासाठी उत्तम ठरेल. 

टीप: वरील माहिती केवळ तुमच्या सामान्य ज्ञानाकरिता आहे. या माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करायचा असेल तर, आधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. 

image credit: pexels