लगेच बदला तुमच्या 'या' 5 दैनंदिन सवयी! नाही तर हाडे होतील कमकुवत

आजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये स्वतःकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. ऑफिस कर्मचारी असोत किंवा गृहिणी सर्वांना वाढत्या वयासोबत हाडांच्या समस्या येत असतात. पण नेहमीच्या कामकाजाच्या व्यापामुळे याकडे सहज दुर्लक्ष होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, काही दैनंदिन सवयी हळूहळू आपली हाडे कमकुवत करतात, ज्यामुळे गुडघेदुखी, थकवा आणि चालण्यास त्रास होत असतो. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा पाच सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या हळूहळू तुमची हाडे कमकुवत करतील. आजच बदला पुढील सर्व सवयी- 

Also Read: तेल लावल्याने केसांची होते जलद वाढ? जाणून घ्या केसांशी संबंधित मिथक

कमी पाणी पिणे. 

सामान्यतः असे मानले जाते की, पाणी पिणे हे फक्त हायड्रेशनसाठी असते. खरं तर, दररोज पुरेसे पाणी न पिल्याने सांधे कोरडे होऊ शकतात, वेदना होऊ शकतात आणि कॅल्शियम शोषण देखील बिघडू शकते. म्हणून, शक्य असल्यास, दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यायचे प्रयत्न करा.

कॅल्शियम आणि प्रोटीन कमी घेणे. 

आपल्या शरीराला हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि प्रोटीन आवश्यक असतात. आताच्या जगात लोक प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड आणि चहा आणि कॉफीचे सेवन जास्त करतात. यामुळे अनेकांमध्ये पौष्टिक कमतरता निर्माण होत आहेत. म्हणूनच कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता होऊन हाडे कमकुवत होऊ शकतात. यावर उपाय म्हणून तुम्हाला तुमच्या आहारात कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

सूर्यप्रकाश न घेणे. 

आपल्या शरीराला हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन D ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे हाडांच्या दुखण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही कमतरता दूर करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ चांगले मानले जातात, परंतु सर्वोत्तम स्रोत हा सूर्यप्रकाश आहे. कामाच्या व्यापामुळे त्यांना उन्हात थोडा वेळही घालवता येत नाही, जे व्हिटॅमिन D च्या कमतरतेचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे तुम्ही किमान अर्धा तास तरी सूर्यप्रकाश नक्कीच घ्यायला हवे. 

जागरण आणि कमी झोप 

आजकाल लोकांना मोबाईल फोनचे इतके व्यसन लागले आहे की, फोनवर व्हॉट्सऍप किंवा सोशल मीडिया चेक न करता कुणीही झोपत नाही. सहसा लोक रात्रीच्या वेळी तासनतास शोज, ड्रामा पाहण्यात पाहण्यात तर काही गेम खेळण्यात घालवतात. या सर्व वाईट सवयीनमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता धोक्यात येते. होय, रात्री उशिरा झोपल्याने हाडांच्या पेशी कमकुवत होतात. म्हणून, दररोज 7 तास झोप घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

जास्त वेळ बसून काम करणे. 

आजकाल अनेकांचे डेस्क जॉब असल्यामुळे, त्यांना तासन्तास बसून काम करावे लागते. मात्र, सतत एकाच स्थितीत बसल्याने रक्ताभिसरण कमी होतो, ज्यामुळे हाडांच्या कार्यावर देखील परिणाम होतो. एवढेच नाही तर, तुमचा पाठीचा कणा कमकुवत होतो. तसेच, पाठ आणि गुडघेदुखी, स्नायू कमकुवत होणे, अशा समस्या तयार होतात. म्हणून, काम करताना तुम्ही दर 1 2 तासांनी ब्रेक घ्या आणि वॉक करा.  

टीप: वरील सर्व माहिती तुमच्या सामान्य ज्ञानकरिता आहे. तुम्हाला या माहितीचा वापर करायचा असल्यास आधी एक्सपर्ट्सकडून सल्ले नक्की घ्या. 

Image credit: pexels