लांब, जाड, सुंदर केस प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. केसांची सज्जा करून कुठेही छान मिरवता यावं, असं प्रत्येकाला वाटत. पण केशसज्जा करण्यासाठी तुमचे केसदेखील त्या दर्जाचे असणे, आवश्यक आहे. केसांच्या योग्य वाढीसाठी आणि केसांशी संबंधित कोंडा, केस गळणे, केस तुटणे आणि दुभंगणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी केसांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी केस राखण्यासाठी लोक महागडे शॅम्पू, सीरम, तेल, हेअर मास्क, हेअर पॅक आणि कंडिशनर वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का? केसांबद्दल अनेक गैरसमज आहेत ज्यावर लोक सहज विश्वास ठेवतात. चला तर मग जाणून घेऊयात केसांची संबंधित प्रसिद्ध मिथक-
Also Read: थंडीला झाली सुरुवात! कसे कराल सर्दी-खोकल्यपासून संरक्षण? 'अशा'प्रकारे रहा निरोगी
तेल लावल्याने केसांची वाढ होते.
साधारणतः हेयरकेयरचा पहिला नियम सांगितले जात असेल, तो म्हणजे केसांना तेल लावणे. केसांना तेल लावणे ही एक जुनी केसांची काळजी घेण्याची पद्धत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, केसांना तेल लावल्याने केसांची वाढ होते. पण हे एक मिथक आहे, कारण केसांची तेले थेट केसांच्या वाढीस चालना देत नाहीत. ते टाळूला पोषण देतात आणि नुकसान होण्यापासून वाचवतात. यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच, जेव्हा तुम्ही तुमच्या टाळूला शॅम्पू करता तेव्हा टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढते. हे सर्व घटक केसांच्या वाढीस हातभार लावतात. मात्र, थेट केसांच्या वाढीवर कार्य करत नाही.
पांढरे केस उपटल्याने इतर केसही पांढरे होतात का?
आपण अनेकांकडून ऐकले असेल की, एक पांढरा केस उपटला तर जवळपासचे इतरही केस पांढरे होतात. होय, असाही एक व्यापक समज आहे. खरं तर, तज्ज्ञ सांगतात की, केसांच्या छिद्रांमधून फक्त एकच केस उगवतो, त्यामुळे तुम्ही उपटलेले पांढरे केस त्याच्या जागी परत वाढतात. इतरत्र केस पांढरे होतात तेव्हाच त्यांच्या रंगद्रव्य पेशी मरतात.
महत्तवाचे लक्षात घ्या की, तुम्ही तुमच्या डोक्यावरील केस उपटू नयेत, कारण यामुळे तुमच्या टाळूला त्रास होऊ शकतो. केसांची नीट काळजी न घेणे, किंवा पोषक आहार न घेणे, प्रदूषण, वृद्धत्व या सर्व कारणांनी केस पांढरे होण्याची समस्या वाढते.
ड्राय स्काल्पमुळे कोंडा (डँड्रफ) होतो.
ड्राय स्काल्पमुळे कोंडा म्हणजेच डँड्रफ होतो असा एक समज आहे, पण असे काही नाही. कधीकधी, टाळू कोरडे असतानाही डँड्रफची समस्या होत नाही. दुसरीकडे, टाळू कोरडे नसतानाही, टाळूवर यीस्टच्या अतिवृद्धीमुळे कोंडा होतो, ज्याची अनेक कारणे असू शकतात.
जर तुम्हाला चिकट, तेलकट कोंडा असेल आणि तेल लावले तर ते आणखी खराब होऊ शकते. दही आणि लिंबू सारखे घटक कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. यासह सॅलिसिलिक ऍसिड, सेलेनियम डायसल्फाइड आणि केटोनाझोल असलेली प्रोडक्ट्स देखील डँड्रफ दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत, असे सांगितले जाते. पण हे निराकरण वापरण्याच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
केसांचे फाटे (स्प्लिट एंड्स) रिपेयर होऊ शकतात?
जवळपास प्रत्येक मुलगी स्प्लिट एंड्सच्या समस्येमुळे त्रस्त आहे. होय, मुलींमध्ये स्प्लिट एंड्स ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. तुम्ही टीव्हीवर पाहिलेच असेल की, अनेक प्रोडक्ट्स स्प्लिट एंड्स दुरुस्त करण्याचा दावा करतात. परंतु, स्प्लिट एंड्स फक्त ट्रिमिंगद्वारे काढता येतात. ते पुन्हा दुरुस्त करता येत नाहीत. क्रीम, कंडिशनर आणि सीरममध्ये बहुतेकदा सिलिकॉनसारखे घटक असतात, जे केसांवर एक थर तयार करतात, स्प्लिट एंड्स एकत्र आणतात. यासह तुमचे केस निरोगी दिसण्यात मदत होते.
तेलकट केसांना कंडिशनरची गरज नसते?
असाही एक प्रसिद्ध गैरसमज आहे की, तेलकट त्वचा आणि केसांना मॉइश्चरायझरची गरज नसते. होय, एक गैरसमज आहे की, तेलकट केसांना कंडिशनरची गरज नसते. तज्ज्ञ सांगतात की, सर्व प्रकारच्या केसांच्या लोकांनी कंडिशनरचा वापर करावा. कारण शॅम्पू, हेअर स्प्रे किंवा अल्कोहोल-आधारित केसांची काळजी घेणारी प्रोडक्ट तुमचे केस कोरडे करतात, ज्यामुळे कंडिशनर त्यांना स्मुथनेस देण्यासाठी फायदेशीर ठरतो.
टीप: वरील सर्व माहिती तुमचं सामान्य ज्ञानकरीत आहे. तुम्हाला वरील माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करायचा असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
image credit: pexels
