घरच्याघरी बनवा व्हिटॅमिन C सिरम! पहा अगदी सोपी आणि सर्वोत्तम पद्धत

हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची आणि निरोगी आहार घेण्याचा साल दिला जातो. आपणा सर्वांना माहितीच आहे की, व्हिटॅमिन C हे त्वचेसाठी सर्वात आवश्यक व्हिटॅमिन मानले जाते, कारण ते कोलेजन उत्पादनास मदत करते.व्हिटॅमिन C त्वचेच्या लवचिकतेसाठी आवश्यक आहे. यामुळे सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि डाग टाळण्यास मदत होते. एवढेच नाही तर, हे हायपरपिग्मेंटेशन आणि काळे डाग टाळण्यास देखील उपयुक्त आहे.

Also Read: हिवाळ्यात ओठ फुटत आहेत? तुमची 'ही' वाईट सवय आहे कारण, लगेच बदला

आणि म्हणूनच बरेच लोक त्यांच्या चेहऱ्यावर व्हिटॅमिन C सीरम देखील लावतात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये केमिकल्स देखील असतात. मात्र, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, व्हिटॅमिन C सिरम तुम्ही घरी देखील बनवू शकता. 

फेशियल व्हिटॅमिन C सिरम 

व्हिटॅमिन C सिरम बनवण्यासाठी, 

- सर्वप्रथम एका काचेच्या वाटीमध्ये एलो वेरा जेल आणि गुलाबजल एकत्र करा. एक मऊ, पातळ पेस्ट बनवा.

- आता यात व्हिटॅमिन C पावडर घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर व्हिटॅमिन E ऑइल आणि व्हेजिटेबल ग्लिसरीन त्यात मिक्स करा. आता मऊ, पातळ पेस्ट तयार होईल.

- ड्रॉपरसोबत येणाऱ्या काचेच्या बाटलीत सीरम साठवून घ्या. त्याआधी बाटली स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. हे सीरम थंड, कोरड्या जागी ठेवा. महत्त्वाचे म्हणजे हे सिरम 4 ते 5 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरु नका. 

संत्र्याच्या सालींपासून सीरम बनवण्याची सोपी पद्धत 

संत्री आणि त्यांच्या सालींमध्ये व्हिटॅमिन C आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. तुम्ही संत्र्यापासून देखील व्हिटॅमिन C सिरम बनवू शकता. 

- प्रथम, सर्वप्रथम दोन संत्र्याच्या साली घ्या आणि त्या उन्हात वाळवा. नंतर, त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. 

- ही पावडर एका वाटीत घेऊन त्यात दोन चमचे कोरफड जेल आणि दोन चमचे गुलाबजल मिक्स करा.

- या मिश्रणामध्ये थोडे पाणी घाला. आता रेफ्रिजरेटरमध्ये ते हवाबंद बाटलीत साठवून ठेवा. हे सिरम देखील  4 ते 5 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरु नका. 

ग्लिसरीन आणि संत्र्याचा रस 

ग्लिसरीन आणि संत्र्याचा रस यांपासून सिरम बनवण्यासाठी तुम्ही एका लहान भांड्यात 1 टेबलस्पून ताजा संत्र्याचा रस, 1 टीस्पून एलोवेरा जेल आणि 1 टीस्पून ग्लिसरीन मिक्स करा. यामुळे व्हिटॅमिन C सीरम तयार होईल. तुम्ही ते स्प्रे बाटलीत साठवून 4-5 दिवस वापरू शकता.

महत्त्वाचे 

 घरगुती व्हिटॅमिन C सीरम किंवा इतर कोणताही उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. काही लोकांना काही घटक आणि पदार्थांपासून एलर्जी देखील असू शकते, ज्यामुळे त्यांच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. म्हणून महत्त्वाचे लक्षात घ्या की, तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय हे उपाय वापरणे टाळा, कारण यामुळे त्वचेला नुकसान देखील होऊ शकते.

image credit: pexels