Happy Childrens Day 2025: भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालकदिन साजरा केला जातो. हा दिवस मुलांच्या हक्कांचे, त्यांच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजच्या जगात सर्व डिजिटल झाल्यामुळे मुलांचा अभ्यास देखील डिजिटल पद्धतीनेच होतो. स्क्रीन अधिक प्रमाणात बघितल्याने मुलांच्या मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्ती प्रभावित होऊ शकते. अशा परिस्थितीत, मुलांना योग्य पोषण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या लेखात आम्ही तुम्हाला मुलांची स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी आणि तल्लख बुद्धीसाठी काही सुपरफूड्स सांगणार आहोत.
Also Read: थंडीला झाली सुरुवात! कसे कराल सर्दी-खोकल्यपासून संरक्षण? 'अशा'प्रकारे रहा निरोगी
बदाम
तल्लख बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदामाचे सेवन करावे, असा सल्ला किंवा टोमणा हा मिळतंच असतो. होय, बदाम ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन E ने समृद्ध असतात. ते मेंदूच्या पेशींना बळकटी देतात आणि एकाग्रता सुधारतात. मुलांनी झोपण्याआधी भिजलेले 2 बदाम खाल्ल्यास त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
अक्रोड
अक्रोडला "ब्रेन फूड" म्हणून देखील संबोधले जाते. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे मेंदूची जळजळ कमी होऊन मुलांचे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तुम्ही मुलांना नाष्टा किंवा दयासह अक्रोड देऊ शकता.
अंडी
अंडी हे प्रथिने आणि कोलाईनचा चांगला स्रोत आहेत. अंडी मेंदूच्या न्यूरॉन्ससाठी महत्वाची मानली जातात. नियमितपणे अंडी खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारू शकते. तुम्ही तुमच्या मुलांना नाश्त्यात उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट देऊ शकता. आठ्वड्यातून एकदा अंडा करी देखील खूप चविष्ट असते.
हिरव्या भाज्या आणि फळे
ब्रोकोली, वाटाणे आणि भोपळा यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे पदार्थ ब्रेन ग्रोथसाठी उपयुक्त आहेत. संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी सारखी फळे व्हिटॅमिन C ने समृद्ध असतात आणि मुलांची स्मरणशक्ती देखील तीक्ष्ण करतात.
पपई आणि पालक
पपई व्हिटॅमिन C आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. ते मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तसेच, पालक हे हिवाळ्यातील एक सुपरफूड आहे, जे मुलांच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. यामध्ये लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन B9 भरपूर प्रमाणात असते. हे मुलांच्या मेंदूला सक्रिय करतात आणि त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करतात. तुम्ही पालकची भाजी किंवा पालक पराठा मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकता.
दही
दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असतात, जे मेंदू आणि पोट दोघांसाठीही फायदेशीर आहे. दररोज दही खाणे, मुलांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तुम्ही फळांची तुकडे घालून किंवा शहद घालून देखील दह्याचे सेवन करू शकता.
महत्त्वाचे
तुम्ही मुलांच्या हेल्दी डाएटसाठी नेहमी एक नटबॉक्स ठेऊ शकता. आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश असावा. जंक फूड टाळणे उत्तम राहील. तसेच, मुलांना पर्याप्त मात्रेत पाणी पिण्याचे लक्षात आणून द्या.
image credit: pexels
