शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरीपासून थंडी पडायला सुरुवात होते, अशी मान्यता आहे. होय, हिवाळ्याला सुरुवात झाली आहे, ऋतूबदल आपल्यासोबत आनंद आणि नुकसान दोन्ही घेऊन येतो. एकीकडे वातावरणात गारवा आल्याचे समाधान तर, दुसरीकडे थंडीने सर्दी-खोकला होण्याची भीती असते. तर, अशा बदलत्या वातावरणात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कमकुवत इम्युनिटी असलेल्यांसाठी वातावरणातील बदल खूप आव्हानात्मक असते. या ऋतूमध्ये सर्दी, ताप आणि खोकला हे सामान्य आहे. म्हणूनच, योग्य आहार आणि नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
या ऋतूत लोक अनेकदा गरम आणि थंड पदार्थ एकाच वेळी खातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते. बदलत्या ऋतूंमध्ये तुमची इम्युनिटी पॉवर मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला काही गोष्टी देखील लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. या बदलत्या ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण कसे करू शकता, ते पाहुयात.
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आहार घ्या.
बदलत्या हवामानात तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. या ऋतूत तुम्ही तुमच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत. एका प्रकाशनानुसार, बदलत्या ऋतूंमध्ये हायड्रेटेड राहणे अत्यंत महत्वाचे आहे. हे करण्यासाठी, पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
त्याबरोबरच, झिंक, मॅग्नेशियम, सूक्ष्म पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स C, D आणि E सारख्या खनिजांनी समृद्ध असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.
जाड आणि उबदार कपडे वापरा.
ऑक्टोबरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी हवामान खूप थंड असते. परंतु बरेचदा दुपारी खूप गरम असू शकते. त्यावेळी तुम्ही उबदार कपडे घालू शकत नाही, म्हणून जाड कपडे वापरू शकता. हे तुम्हाला थंडीपासून वाचवतील आणि तुम्हाला जास्त गरम देखील होणार नाही.
दररोज व्यायाम करा.
तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. म्हणून, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायामाची वेळ ठरवा. तुम्ही योगा, स्ट्रेचिंग किंवा व्हॉकिंग करू शकता. यामुळे तुमचे शरीर ऍक्टिव्ह राहील आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. अशा निरोगी लाइफस्टाइलमुळे तुम्ही नक्कीच आजारापासून लांब राहाल.