Makeup Tips: V शेप ते W शेपपर्यंत! ब्लश लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, तुमच्या चेहऱ्याच्या आकारासाठी कोणता आहे परफेक्ट?
Makeup Tips: जवळपास प्रत्येक मुलींना मेकअप करायला आवडते. मेकअप तुमच्या चेहऱ्यावर केवळ ग्लो आणत नाही तर, तुमच्यातील आत्मविश्वास देखील वाढवतो. खरं तर, ब्लश मेकअपमध्ये मस्कारा, फाउंडेशन, लाइनर आणि लिपस्टिक सोबत महत्त्वाची भूमिका बजावते. ब्लशचा वापर गाल गुलाबी दिसण्यासाठी केला जातो. विशेषतः हिवाळ्यात मुलींना ब्लश खूप आवडतो. मात्र, जर ब्लश चुकीच्या पद्धतीने लावला गेला तर तो तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकतो. पण तुम्ही काही चिंता करू नका, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला ब्लश लावण्याच्या योग्य पद्धती सांगणार आहोत.
Also Read: हिवाळ्यात ओठ फुटत आहेत? तुमची 'ही' वाईट सवय आहे कारण, लगेच बदला
V ते W पर्यंत... ब्लश लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
वर सांगितल्याप्रमाणे, ब्लश लावण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे की V, W, L आणि C या शेपचा ब्लश लावताना अवलंब केला जातो. ब्लश तुमचे गाल हायलाइट करण्यासाठी, तुमच्या स्किन कलरनुसार योग्य त्या टोनचे निवडले जातात. प्रत्येक पद्धत कोणत्या पद्धतीने वेगळा लूक तयार करते आणि तो कसा लावायचा ते समजून घेऊयात:
V शेप ब्लश
| image credit: google |
V- शेप ब्लश गालांना अधिक शार्प आणि स्लिम दिसण्यास मदत करतो. V शेपचा ब्लश लावण्यासाठी, तुमच्या गालाच्या हाडांच्या वरच्या भागापासून सुरुवात करा. थोडेसे बाहेरून, तुमच्या टेंपल्सकडे वरच्या दिशेने मिसळा आणि चांगले मिसळा.
W शेप ब्लश
| image credit: google |
या प्रकारच्या ब्लशमुळे सन किस्ड, यंग आणि क्युट लूक येतो. तो गालाच्या हाडांपासून नाकाच्या वरपर्यंत लावला जातो. गालाच्या वरच्या बाजूला ब्लश लावायला सुरुवात करा आणि नाकाच्या पुलापासून दुसऱ्या गालावर हलकेच ब्लेंड करा. अशाप्रकारे तुम्हाला W शेप ब्लश मिळतो.
C शेप ब्लश
C- शेप ब्लश चेहऱ्याला लिफ्टेड आणि फ्रेश लूक देतो. महत्त्वाचे लक्षात घ्या की, पार्टी किंवा फंक्शनसाठी C शेप ब्लश आदर्श आहे. यासाठी तुम्ही ब्लश गालाच्या हाडांपासून कपाळाच्या हाडापर्यंत C शेपने ब्लेंड करा.
L शेप ब्लश
| image credit: google |
सर्वप्रथम ऍप्पल ऑफ चिक्सवर ब्लश लावा. तिथून, ब्लश टेम्पल्सपर्यंत ब्लेंड करा. नंतर, त्याच पॉईंटपासून ब्लश हलके-हलके जबळ्याकडे खाली ब्लेंड करा. यामुळे चेहरा एक शार्प आणि डिफाईंड लूक देतो.
स्ट्रेट लाईन ब्लश
कोणत्या फेस शेपसाठी कोणती पद्धत वापरावी?
वेगवेगळ्या चेहऱ्याच्या आकारांसाठी वेगवेगळ्या ब्लश स्टाईल कार्य करतात.
- गोल, अंडाकृती किंवा गुबगुबीत गाल असलेल्यांना L-आकाराचा ब्लश शोभतो.
- अंडाकृती आणि हार्ट शेप चेहऱ्यांवर W-आकाराचा ब्लश चांगला दिसतो.
- गुबगुबीत आणि गोल चेहरे असलेले लोक V-आकाराचा ब्लश देखील वापरून पाहू शकतात.
या पद्धती तुमचा चेहरा हायलाइट करण्यास मदत करतात. तसेच, यासह तुम्हाला एक सुंदर आणि कॉन्फिडेंट मेकअप लुक मिळतो.
टीप: जर तुम्हाला ब्लश लावण्याच्या पद्धतींबद्दल आणखी सविस्तर आणि सखोल माहिती हवी असेल तर, यु-ट्यूब व्हीडिओची मदत नक्की घ्या.