Winter skincare tips: हिवाळ्यात तुमचा चेहरा देखील काळवंडतोय का? जाणून घ्या कारणे आणि सोपे उपाय


हिवाळा हा ऋतू अनेकांचा प्रिय ऋतू असतो. हिवाळ्यातील गारवा शांतात, आनंद आणि आराम देतो. मात्र, हिवाळ्यातील गारवा आपल्या त्वचेसाठी अनेक आव्हाने देखील निर्माण करतो. होय, थंडी जसजशी वाढत जाते, तसतसे अनेकांना काळेपणा, कोरडेपणा, डाग आणि पिगमेंटेशन जाणवू लागतात. यामध्ये, सर्वात मोठी समस्या म्हणजे 'चेहरा काळवंडणे' होय. चेहरा काळा पडण्याला लोक अनेकदा फक्त टॅनिंग आहे असे समजून दुर्लक्ष करतात. पण हे समजणे आवश्यक आहे की, जर तुम्ही वेळीच त्याकडे लक्ष दिले नाही तर त्वचेची नैसर्गिक चमक कायमची नाहीशी होण्याची शक्यता आहे. 

Also Read: घरच्याघरी बनवा व्हिटॅमिन C सिरम! पहा अगदी सोपी आणि सर्वोत्तम पद्धत

चला तर मग जास्त वेळ न घालवता, आपण हिवाळ्यात चेहरा काळवंडण्याची कारणे, ते कसे टाळता येईल आणि कोणत्या घरगुती किंवा वैद्यकीय टिप्स तुमची त्वरा चमकदार ठेवण्यास, सहाय्य्य करतील ते बघुयात:  

चेहरा काळवंडण्याची कारणे 

कोरडेपणा आणि ओलाव्याचा अभाव

हिवाळ्यात हवा अत्यंत कोरडी असते, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो. जेव्हा त्वचा निर्जलित होते, तेव्हा तिचा पोत खराब होतो. ज्यामुळे तुमची त्वचा निस्तेज, खडबडीत आणि काळी पडते. ओलाव्याच्या कमतरतेमुळे त्वचेचा वरचा थर कडक होतो आणि त्यावर काळे डाग पडतात.

सूर्यकिरण 

लोकांचा असा समज आहे की, हिवाळ्यात सूर्यप्रकाश हानिकारक नाही, परंतु हिवाळ्यात UV-A किरणे तितकीच तीव्र असतात. हे किरण त्वचेला आतून टॅन करतात, पिगमेंटेशन वाढवतात आणि तुमच्या त्वचेचा टोन डार्क दिसतो. हिवाळ्यात लोक कमी सनस्क्रीन वापरतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढते.

डेड स्कीन 

लक्षात घ्या की, थंड हवामानामुळे त्वचेच्या पेशींच्या नूतनीकरणाची प्रक्रिया मंदावते. यामुळे चेहऱ्यावर मृत त्वचा म्हणजेच डेड स्कीन जमा होते. या थरामुळे त्वचा निस्तेज, काळी आणि निर्जीव दिसते. एक्सफोलिएशनशिवाय नवीन, तेजस्वी त्वचा उदयास येत नाही.

चेहरा काळा पडण्यापासून कसे थांबवाल? 

मॉइश्चरायझर आणि हायड्रेशनवर लक्ष केंद्रित करा. 

हिवाळ्यात, तुमच्या त्वचेला डीप हायड्रेशनची आवश्यकता असते. दिवसातून 2-3 वेळा हायलुरोनिक ऍसिड, शिया बटर, ग्लिसरीन किंवा सेरामाइड असलेले मॉइश्चरायझर्स लावा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आणि कोरडेपणामुळे होणारे काळे डाग टाळता येतात. तसेच, भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे.

दररोज सनस्क्रीन लावा. 

हिवाळ्यातही दररोज सनस्क्रीन लावणे अत्यंत महत्वाचे आहे. अतिनील किरणे तुमच्या लक्षात न येता त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात आणि टॅनिंग वाढवू शकतात. बाहेर पडताना तुमचा चेहरा स्कार्फ किंवा हुडीने झाका. यामुळे पिगमेंटेशन रोखण्यास मदत होते.

एक्सफोलिएशन 

आठवड्यातून दोनदा सौम्य एक्सफोलिएटर किंवा घरगुती स्क्रब वापरा. ​​यामुळे डेड स्किन रिमूव्ह होईल आणि तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक परत येते. लक्षात ठेवा की, जास्त स्क्रब केल्याने तुमच्या त्वचेला नुकसान देखील होऊ शकते.

टिप: वरील माहिती तुमच्या सामान्य ज्ञानाकरिता आहे. जर तुम्हाला दिलेल्या माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करावयाचा असेल तर, आधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

image credit: Google, pexels