आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात, महिला अनेकदा घर, कुटुंब या सर्वात अडकलेल्या दिसतात. त्यातल्या त्यात वेळेचा अभाव, जबाबदाऱ्या आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे हळूहळू अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स, थकवा, अशक्तपणा, ताण, अनियमित मासिक पाळी, केस गळणे आणि झोपेच्या समस्या वाढत्या प्रमाणात सामान्य होत आहेत. पण काळजी करू नका, या समस्यांवर सोपे निराकरण देखील आहेत. होय, आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सवयी अंगिकारल्याने महिलांच्या अधिकतर आरोग्य समस्या कमी होण्याची शक्यता आहे.
Also Read: काय आहे हंसिकाच्या स्लिम-ट्रिम बॉडीचे गुपित! Pilates एक्सरसाइज म्हणजे काय? सेलेब्समध्ये पॉप्युलर
tv9 ने दिलेल्या रीपोर्टनुसार, सुप्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये टॉप न्यूट्रीशिनिस्ट राशी चौधरी यांनी महिलांना चार आवश्यक सवयी अंगीकारण्याचा सल्ला दिला आहे. या सवयी नियमितपणे त्यांच्या जीवनशैलीत समाविष्ट केल्यास, आरोग्य आणि दैनंदिन समस्यांपासून 70% आराम मिळू शकतो.
ब्लड शुगर कंट्रोलसाठी हेल्दी फॅट घ्या.
जेवणाची सुरुवात हेल्दी फॅट्ससह केल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढण्यापासून रोखले जाते. जेव्हा महिला प्रथम कार्बोहायड्रेट किंवा गोड पदार्थ खातात, तेव्हा ते इन्सुलिन स्पाइक निर्माण करतात. ज्यामुळे स्ट्रेस, चिडचिड आणि लवकर भूक लागते. जेवणापूर्वी थोडेसे तूप, काजू, बिया किंवा दही यांचे सेवन केल्याने ब्लड शुगर स्टेबल होण्यास आणि दीर्घकाळ एनर्जेटिक राहण्यास मदत होते.
पुरेसे प्रोटीन
महिलांमध्ये अशक्तपणा, केसगळती आणि हार्मोनल समस्यांचे प्रमुख कारण म्हणजे प्रोटिन्सची कमतरता मानली जाते. न्यूट्रिशनिस्ट राशी चौधरी म्हणतात की, प्रत्येक जेवणात पुरेसे प्रोटीन असणे आवश्यक आहे. त्यासाठी डाळी, अंडी, चीज, दही, टोफू आणि काजू यांसारख्या पदार्थांचे सेवन शरीराची दुरुस्ती करतात.
कार्बोहायड्रेट्सपेक्षा फायबरवर लक्ष द्या.
कार्बोहायड्रेट्स जास्त आणि फायबर कमी असलेल्या आहारामुळे वजन वाढू शकते. तसेच, पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, न्यूट्रिशनिस्ट महिलांनी त्यांच्या आहारात फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे योग्य संतुलन राखण्याचा सल्ला देतात. संपूर्ण धान्य, भाज्या, फळे आणि बिया केवळ पचन सुधारत नाहीत तर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतात. यासह पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
रात्रीचे जेवण लवकर आणि लाईट घ्या.
रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्था कमकुवत होते, यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. लवकर जेवण केल्याने झोप सुधारते, हार्मोन्स संतुलित होतात आणि सकाळी पोटदेखील सहज साफ होते. तसेच, हलके आणि संतुलित जेवण शरीराला बरे होण्यासाठी पुरेसा वेळ देते.
IMAGE CREDIT: PEXELS