Cannes Queen Aishawarya Rai Bachchan: सौंदर्याची खाण ऐश्वर्याची अप्रतिम एन्ट्री! Luminara लूकने जिंकली सर्वांची मने
Cannes 2026 मध्ये अखेर सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची एंट्री झाली किंवा कान्सच्या खऱ्या क्वीनची एंट्री झाली आहे, असे देखील म्हणता येईल. असे म्हटले जाते की, काही 'रेड कार्पेट्स' केवळ चालण्यासाठी असतात; पण ज्यांच्यावर ऐश्वर्या राय बच्चन पाऊल ठेवते, ते मात्र जिवंत होतात. यंदा कान्सचा 79th फेस्टिवल सुरु आहे. ऐश्वर्या दरवेळी आपल्या अनोख्या लूक्सने सर्वांच्या मनावर राज्य करते. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात यंदा ऐश्वर्याच्या लूक्समध्ये काय विशेष होते?
Also Read: Met Gala 2026: आईच्या दागिन्यांनी बनवला डायमंड ब्लाउज, मँगो पर्स... ईशा अंबानीचा अनोखा मेट गाला लूक
भारतीय डिझायनर अमित अग्रवाल यांनी खास तयार केलेल्या Luminara ड्रेसमध्ये अवतरली. हा ड्रेस गाऊनपेक्षा निसर्गाच्या एका दिव्य शक्तीसारखा अधिक दिसतो. आम्ही तुम्हाला सांगतो वातावरणातील प्रकाश शोषून घेणाऱ्या डार्क ब्लु कलरमध्ये तयार केलेल्या या आऊटफिटमध्ये, डिझायनरच्या बायोमिमिक्रीच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासातून साकारलेले पंखांसारखे म्हणजे विंग शोल्डर एक्सटेन्शन्स होते, ज्यामुळे ऐश्वर्याला एक स्वर्गीय अस्तित्व आणि एक जिवंत कलाकृती असलेला एक खास लुक मिळाला.
ऐश्वर्याचा ड्रेस कसा तयार करण्यात आला?
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या ड्रेसमध्ये 1500 हून अधिक तास खर्चून हाताने साकारलेली 'क्रिस्टल व्हेन' (Crystal Vein) नक्षीकाम होते. तसेच हजारो क्रिस्टल अलंकारांनी विणलेली एक अत्यंत नाजूक नेट होती, जी चालताना सर्वत्र लाईट रिफ्लेक्ट करत होती. त्यातूनच प्रकाश येत असावा असं फील येत होते. हा एक सामान्य आऊटफिट नसून अमित अग्रवाल यांनी तयार केलेला एक एनर्जी फिल्ड म्हणजेच ऊर्जा स्रोत असल्यासारखे भासतो.
काय म्हणाले अमित अग्रवाल?
याबद्दल बोलताना अमित अग्रवाल म्हणाले, "ऐश्वर्याने नेहमीच एक वेगळे व्यक्तिमत्व आणि उत्क्रांतीच्या प्रबळ जाणिवेसह कान्सकडे पाहिले आहे. 'लुमिनारा'च्या माध्यमातून, मोहित आणि मला असे काहीतरी तयार करायचे होते, जे केवळ एका वस्त्रापेक्षा तिच्याभोवतीच्या ऊर्जाक्षेत्रासारखे अधिक वाटावे. ही कलाकृती प्रकाशाला सामर्थ्य, गती आणि परिवर्तन म्हणून सादर करते, तसेच जागतिक स्तरावर अनेक दशकांपासून तिने जपलेल्या विलक्षण तेजाचा सन्मान करते.”
ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्यासोबत कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी झाली असून, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवातील तिचे हे 24 वे वर्ष आहे.
image credit: Instagram