योग क्रिया तुमचे शरीर आणि मन आणि मानसिकता निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, योगामध्ये विविध प्रकारच्या प्राणायामापासून ते सोप्या आणि कठीण योगासनांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. यामुळेच तुमचे सर्वांगीण आरोग्य राखण्यास मदत होते. होय, प्रत्येकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला पाहिजे. मात्र महत्त्वाचे लक्षात घ्या की, नवशिक्यांसाठी (Beginners) खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला ऑनलाइन अनेक योगाचे व्हिडिओ मिळतील. परंतु जर तुम्ही ट्रेनरशिवाय योग सुरू करत असाल, तर काही गोष्टींची तुम्हाला दक्षता घ्यायला हवी.
Also Read: Gen Z वर्कर्स तनाव से निपटने के लिए सिनेमाघरों और फिटिंग रूम क्यों जाते है?
हे खरंय की, योग्य प्रकारे योगाभ्यास केल्यास तुमचे एकंदर आरोग्य सुधारू शकते. मात्र, तरी काही वरवर सामान्य वाटणाऱ्या चुका तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. उदा, स्नायूंना दुखापत होणे, थकवा येणे, हृदयावर दाब, ताण आणि चक्कर येणे. या समस्या टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे सामान्य चुका करू नका:
वार्मअप न करणे.
जिममध्ये हेवी वर्कोट करण्यापूर्वी वॉर्म अप करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कठीण योगासने करण्यापूर्वी शरीराची तयारी करणे देखील महत्त्वाचे आहे. तुमची दैनंदिन दिनचर्या पूर्ण केल्यानंतर, तुम्ही सूक्ष्म व्यायाम करा, अन्यथा कठीण योगासने करताना तुमच्या स्नायूंना खूप ताण येऊ शकतो.
अयोग्य श्वसन
योग आणि प्राणायाम करताना आपल्या श्वासाच्या लयीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अयोग्य श्वसनामुळे तुमच्या शरीरातील ताण वाढू शकतो. यामुळे केवळ तुमच्या कामगिरीत अडथळा येत नाही, तर अंतर्गत अवयवांवरील प्रेशर वाढतो.
स्वतःवर अतिरिक्त ताण घेणे.
जेव्हा तुम्ही योगाभ्यास सुरू करता, तेव्हा तुमचे शरीर एकाच बैठकीत अवघड आसने पूर्ण करण्याइतके लवचिक आणि तयार देखील नसते. त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी दररोजचा सराव आवश्यक आहे. ही आसने योग्यरित्या करण्यासाठी आणि तुमची लवचिकता सुधारण्यासाठी तज्ञ अनेक युक्त्या देखील सांगतात. त्यामुळे, प्रशिक्षकाशिवाय सुरुवातीच्या काळात शरीर जास्त वाकवण्याचा प्रयत्न केल्यास स्नायू आणि सांध्यांना दुखापत होऊ शकते. म्हणून एक्सपर्ट्सच्या मार्गदर्शनाशिवाय कठीण आसने करणे टाळा.
अयोग्य बॉडी अलाइनमेंट
योगासने करताना, तुम्हाला त्या विशिष्ट आसनासाठी योग्य आसनस्थितीची जाणीव असली पाहिजे. कोणत्याही योगासनादरम्यान शरीराची चुकीची स्थिती किंवा संरेखन तुमच्या अवयवांवर प्रतिकूल परिणाम करू शकते.
शवासन टाळणे.
ज्याप्रमाणे योगाभ्यासाच्या सुरुवातीला वॉर्म-अप करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे संपूर्ण योगाभ्यासानंतर विश्रांती, म्हणजेच शवासन, घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचे संपूर्ण शरीर शिथिल होते आणि योगाचे पूर्ण फायदे मिळतात. महत्त्वाचे लक्षात घ्या की, शवासन न केल्याने मानसिक थकवा आणि स्नायूदुखी होऊ शकते.
image credit: pexels