चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी तुमची झोप होणे, अत्यंत आवश्यक आहे. शरीर स्वस्थ राहावे म्हणून दररोज मानवी शरीराला 6-8 तासांपर्यंत झोप हवी असते. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात योग्य प्रमाणात झोप होणे, जरा कठीणंच आहे. खरं तर, रोजच्या जीवनापासून कंटाळा आल्यास अनेक लोक बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करतात. परंतु झोप पूर्ण करण्यासाठी देखील आता नवीन ट्रेंड सुरु आहे, तो म्हणजे 'स्लीप ट्यूरिझम' होय. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात स्लीप ट्यूरिझमबद्दल माहिती आणि यासाठी भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणे-
Also Read: जुलैमध्ये फिरायला जायचंय? मान्सूनमध्ये '5' ठिकाणे होतात अगदी नयनरम्य, लगेच करा प्लॅन
काय आहे स्लीप ट्यूरिझम?
वर सांगितल्याप्रमाणे, सध्या स्लिप ट्यूरिझमचे ट्रेंड सुरु आहे. यासाठी लोक अशा पर्यटन स्थळी जातात, जिथे त्यांना मानसिक आराम आणि शांत झोप मिळेल. विशेषतः या ठिकाणी साउंड थेरेपी, मेडिटेशन, आयुर्वेदिक उपचार आणि नेचर वॉकिंग असे अनुभव उपलब्ध आहेत. जरीही अनेक लोकांना अजूनही स्लिप ट्यूरिझमबद्दल माहिती नसेल तरी, हे आता अधिक लोकप्रिय आहे.
स्लिप ट्यूरिझममध्ये लोक विशेषतः त्यांचे स्लीपिंग सायकल सुधारण्यासाठी, झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी प्रवास करतात. या ठिकणी केवळ नैसर्गिक सौंदर्य नाहीत तर झोप वाढवणारी थेरपी, साउंड हीलिंग, योग, आयुर्वेदिक मालिश आणि ध्यान यासारख्या विशेष व्यवस्था देखील आहेत.
स्लीप ट्यूरिझमसाठी भारतातील प्रसिद्ध ठिकाणे
ऋषिकेश: भारतातील ऋषिकेश हे योग नागरी म्हणून प्रसिद्ध एक ठिकाण आहे. या ठकाणी स्लिप ट्यूरिझमसाठी अनेक रीट्रेट सेंटर आहेत. या सेंटरमध्ये योग, प्राणायाम आणि आयुर्वेदिक उपचारांसह झोपेची गुणवत्ता सुधारली जाते.
कोडाईकनाल, तामिळनाडू: तामिळनाडूमधील हे ठिकाण देखील स्लिप ट्यूरिझमसाठी उत्तम आहे. हिरव्यागार शालूंनी पसरलेल्या या ठिकाणी 'स्लिप वेलनेस रिट्रीट्स' आहेत. यासह येथील थंड हवामान आणि हिरवळीमध्ये तुमच्या शरीर आणि मनाला विश्रांती मिळेल.
साऊथ गोवा: भारतीय पर्यटनाचे हृदय गोवा (साऊथ गोवा) देखील स्लिप ट्यूरिझमचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. येथे उपस्थित आयुर्वेदिक मसाज सेंटर आणि मड स्पा सेंटरमुळे आरामासाठी या ठिकाणी जाणे, पर्यटक अधिक पसंत करतात.
वायनाड: केरळमधील वायनाड हे ठिकाण पर्यटनासाठी अधिक प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या हे ठिकाण स्लिप ट्यूरिझमसाठी देखील प्रसिद्ध होत आहे. येथील दाट अरण्य आणि टेकड्यांमध्ये अनेक सुंदर, नयनरम्य रिझॉर्ट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी स्लिप डिटॉक्स पॅकेज ऑर केले जातात, ज्यामध्ये हर्बल बाथ, साउंड हीलिंग आणि ऑइल मसाज सारख्या थेरेपी समाविष्ट आहेत.
Image source: gettyimages.in



