उन्हाळ्यातही दीर्घकाळ टिकेल तुमचा मेकअप, फॉलो करा 'या' महत्त्वाच्या टिप्स

आपणा सर्वांना माहितीच आहे की, मेकअपद्वारे मुलींना एक वेगळाच आत्मविश्वास येतो. पण, प्रत्येक सामान्य मुलीची एकच तक्रार असते, ती म्हणजे मेकअप जास्त काळ टिकत नाही. ही तक्रार विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात उन्हामुळे आणि घामामुळे अधिकच वाढते. उन्हाळ्यात उन्हात बाहेर पडताच घामामुळे मेकअप वितळू लागतो. यामुळे तुमचा संपूर्ण लूक खराब होऊन चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. जर तुम्हीही या समस्येमुळे उन्हाळ्यात मेकअप करण्यास घाबरत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. उन्हाळयात मेकअप दीर्घकाळ टिकावा म्हणून खास टिप्स-  

Also Read: Sleep Tourism: भारतातील 'ही' ठिकाणे आहेत स्लीप ट्यूरिझमसाठी प्रसिद्ध, तरुणाईमध्ये वाढतोय क्रेझ

स्किन मॉइश्चराइज करा. 

हिवाळा असो किंवा उन्हाळा, प्रत्येक ऋतूत त्वचेला मॉइश्चराइज करणे, खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात बरेच लोक मॉइश्चरायझर न लावता मेकअप करतात. अशा परिस्थितीत घामामुळे मेकअप लवकर वितळतो. ही समस्या टाळण्यासाठी मेकअपआधी उन्हाळ्यात हलके मॉइश्चरायजर वापरा.

प्राइमर 

जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमचा मेकअप जास्त काळ टिकवायचा असेल तर चांगल्या कॉलिटीचा प्राइमर लावणे खूप महत्वाचे आहे. ते त्वचेवरील अतिरिक्त तेल संतुलित करण्यास मदत करते, ज्यामुळे मेकअप लवकर खराब होत नाही.

ऑइल फ्री फाउंडेशन 

उन्हाळ्यात घामामुळे चेहऱ्यावरील फाउंडेशन फुटून पसरल्यासारखा दिसतो. अशा परिस्थितीत तुम्ही लाईट ऑइल फ्री फाउंडेशनचा वापर करावा. एवढेच नाही तर, उन्हाळ्यात फाउंडेशनचा जाड थर लावू नका. 

वॉटरप्रूफ आय मेकअप 

उन्हाळ्यात तुम्ही वॉटरप्रूफ आय मेकअप करावे. यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ मस्कारा आणि आय लाइनरचा वापर करावा, जो दीर्घकाळापर्यंत टिकून राहण्याचे आश्वासन देतो. 

मॅट लिपस्टिक 

लिपस्टिकशिवाय मुलींचा मेकअप अपूर्ण असतो. उन्हाळ्यात, तुम्ही लिक्विड लिपस्टिकऐवजी मॅट लिपस्टिक किंवा टिंटेड लिप बाम वापरावे. खरं सांगायचे झाल्यास, घामामुळे लिक्विड लिपस्टिक वाहून जाण्याची भीती असते. मॅट लिपस्टिकमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता असते. त्यामुळे उन्हाळ्यात मेकअप करताना मॅट लिपस्टिक तुमच्या मेकअप बॉक्समध्ये आवर्जून सामील करा. 

डिस्क्लेमर: वरील टिप्स केवळ तुमच्या सामान्य माहितीसाठी आहेत. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा तुम्हाला या टिप्सचा दैनंदिन जीवनात अवलंब करायचा असेल तर, आधी तुमच्या डॉक्टर्सचा सल्ला नक्की घ्यावा. 

Image Source: pexels