तुम्हालाही तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवायची आहे? आहारात करा 'या' फळांचा समावेश

साधारणतः वाढत्या वयासोबत प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी वाटणे साहजिक आहे. आपली त्वचा दीर्घकाळापर्यंत तरुण राहावी, अशी सर्वांची इच्छा असते. तुम्हाला माहिती आहे का? की निरोगी जीवनशैली आणि उत्तम डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करू शकता. आहारात काही विशिष्ट फळांचा समावेश केल्याने तुम्हाला उत्तम लाभ होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता, अशा काही फळांबद्दल माहिती घेऊयात ज्यांचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्याने तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवण्यास सक्षम असाल. 

Also Read: आहाहा...! उन्हाळ्याच्या गर्मीत तुमचा आत्मा तृप्त करण्यासाठी घरीच बनवता येतील चविष्ट '5' समर ड्रिंक्स

डाळिंब  

डाळिंब हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, डाळिंबात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आढळते. तसेच, यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि आवश्यक फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असल्याने, हे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास प्रभावी ठरू शकते. याशिवाय, हे त्वचेला मॉइश्चराइझ करण्यास आणि त्वचेला ग्लो देण्यास उपयुक्त आहे. 

संत्री 

त्याबरोबरच, संत्री त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. संत्री व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.  त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी संत्र्यांचे सेवन करणे देखील एक चांगला पर्याय आहे. व्हिटॅमिन C तुमच्या त्वचेला  चमकदार आणि तेजस्वी बनवते. अँटिऑक्सिडेंट्स त्वचेवरील ऍक्ने आणि पिगमेंटेशन काढण्यास मदत करतील. यासह सुरकुत्या, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स इ. कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. एवढेच नाही तर, तुमची त्वचा मॉइश्चराइज आणि मुलायम होईल. 

किवी 

किवीमध्ये आढळणारे घटक कोलेजन उत्पादन वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतात. अर्थात जर तुम्ही नियमितपणे किवीचे सेवन केले तर तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवू शकता. किवीच्या सेवनासोबत तुम्ही किवीचे मास्क देखील वापरू शकता. किवीमध्ये देखील व्हिटॅमिन C असतो, ज्याच्या सेवनाने त्वचा चमकदार बनेल. यातील अँटिऑक्सिडेंट्समुळे अकाली वृद्धत्वाची समस्या कमी होईल. यासह किवीच्या सेवनाने पिगमेंटेशन कमी होईल. त्वचा मॉइश्चराइज होईल, तसेच यातील अँटीइंफ्लामेंट्री गुणधर्म त्वचेवरील सूज कमी करण्यास उपयुक्त आहेत. 

पपई 

 पपईमध्ये आढळणारे घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये पपेन नावाचे एन्झाईम आढळते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करेल. तसेच, पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन A आणि C त्वचेला अधिक चमकदार आणि तरुण बनवतात. पपईतील गुणधर्मांमुळे मुरुमांवर नियंत्रण मिळवता येईल. पपईमधील अँटिऑक्सिडेंट्स त्वचेला पोषण देण्यास आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास उपयुक्त ठरतील. 

ब्लु बेरी

ब्लू बेरी तुमच्या आरोग्यावर तसेच तुमच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम करू शकतात. ब्लूबेरी त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून देखील वाचवतात. मात्र, चांगले परिणाम मिळविण्यासाठी या फळांचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन करणे खूप महत्वाचे आहे. ब्लूबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात. याच्या सेवनाने तुमची त्वचा ग्लोइंग, हायड्रेट आणि मॉइश्चराइज होईल. तसेच, डाग पिगमेंटेशनची समस्या देखील हळू-हळू कमी होईल. 

डिस्क्लेमर: वरील माहिती तुमच्या सामान्य ज्ञानाकरिता आहे. जर तुम्हाला या माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करायचा असेल तर, सर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. 

image credit: pexels