रात्रीचे जेवण झाल्यावर जर तुम्ही देखील रात्री उशिरापर्यंत जागरण करत असाल तर, तुम्हाला देखील छोटी छोटी भूक लागतच असेल. कधी कधी छोट्या भुकेमुळे पोटातून गुड-गुड असा आवाज देखील येतो. पण एवढ्या रात्री कोणतेही स्नॅक खाल्ल्यास तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला रात्री उशिरा कोणते स्नॅक किंवा काय खायला हवे ते तुम्हाला या रिपोर्टमध्ये कळेल. चुकीचे काही खाल्ल्यास तुमचे ब्लड-शुगर लेव्हल देखील वाढू शकते.
Also Read: घरच्या घरी ब्लॅक हेड्स रिमूव्हलसाठी याहून सोपे उपाय मिळणे अशक्य, पहिल्याच वेळी मिळेल जबरदस्त रिजल्ट
या समस्येचे समाधान म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हलकं आणि समाधानकारक खाणे तुमच्या ब्लड शुगरसाठी योग्य ठरेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक चविष्ट, कमी ग्लायसेमिक स्नॅक्स आहेत, जे तुमच्या शरीराला कोणताही त्रास न देता तुमची भूक भागण्यास उपयुक्त ठरतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता उशिरा रात्रीची छोटी छोटी भूक भागवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
पनीर क्युब्स
झोपण्यापूर्वी काही पनीर क्यूब्स खाणे तुमची लेट नाईट क्रेविंग भागवण्यासाठी सहज मदत करतील. पनीरमध्ये प्रथिने जास्त आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. त्यामुळे तुमचे पॉट भरून राहील आणि शुगर लेव्हल देखील नियंत्रित राहील.
बदाम
तुम्ही लहानपणीपासून रात्री बदाम खाण्याचे फायदे ऐकत असाल. बदाम तुमच्या बुद्धिसाठी आणि तुमच्या स्वास्थासाठी चांगले आहे. बदाम हेल्दी फॅट्स, फायबर आणि मॅग्नेशियमद्वारे समृद्ध असतात, जे तुमची झोप सुधारतात आणि शुगर लेव्हल नियंत्रित करतात.
उकडलेली अंडी
उकडलेली अंडी तुमची छोटी छोटी भूक भागवण्यासाठी एक सोपा आणि आरोग्यदायी पर्याय आहे. त्यात प्रथिने आणि ट्रिप्टोफॅन असतात, जे मेलाटोनिन म्हणजेच झोपेचे संप्रेरक तयार करून तुमच्या शरीराला चांगली झोप देण्यास उपयुक्त आहेत.
सूप
सूप नेहमीच तुमची छोटी-छोटी भूक भागवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही टोमॅटो सूप, व्हेजिटेबल सूप किंवा डाळीचे सूप देखील बनवू शकता. विशेष म्हणजे गरम मूग डाळीचा सूप खूप हलका आणि पचायला सोपा असतो. तो हळूहळू ऊर्जा देतो आणि तुमची शुगर लेव्हल देखील संतुलित ठेवतो.
डिस्क्लेमर: वरील माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्याआधी तुम्ही डॉक्टर्स किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
image credits: pexels




