आनंदाचे झरे पाहायला मान्सूनमध्ये कॅम्पिंग करायचे आहे? आवर्जून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टींची काळजी

सध्या मान्सून सुरु आहे, जिकडे- तिकडे पाणीच पाणी आनंदाचे झरे वाहताना दिसत आहेत. हेच आनंदाचे झरे पाहायला तुम्ही देखील कॅम्पिंग प्लॅन करत आहात का? तुम्ही देखील जंगल, दऱ्या, हिरवी झाडे पाहण्यासाठी आतुर आहात. या ऋतूत जंगलात किंवा पर्वतांमध्ये कॅम्पिंग करण्याचा अनुभव अधिक रोमांचक असतात. परंतु पावसात बाहेर रात्र घालवण्याचा धोकाही तितकाच मोठा आहे. विशेषतः जर तुम्ही तयारीशिवाय कॅम्पिंग करायला बाहेर गेलात तर, तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात. तुम्ही या पावसाळ्यात कॅम्पिंग ट्रिपची योजना आखत असाल तर पुढील महत्त्वाच्या टिप्स तुमच्या नक्की कामात येतील. 

Also Read: जुलैमध्ये फिरायला जायचंय? मान्सूनमध्ये '5' ठिकाणे होतात अगदी नयनरम्य, लगेच करा प्लॅन

वॉटरप्रूफ टेंट 

पावसाळ्यात सामान्य तंबू तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार नाहीत. कॅम्पिंगला जाण्यापूर्वी, उत्तम कॉलिटीचा वॉटरप्रूफ टेंट निवडा. या टेंटमध्ये कव्हर आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी मजबूत झिप असतील. झिप व्यवस्थित आहेत की नाही, हे तपासून घ्या. 

उंच आणि उतारांपासून दूर असलेले ठिकाण निवडा.

कॅम्पिंगसाठी कमी किंवा उताराची ठिकाणे निवडणे टाळा. लक्षात घ्या की, अशा ठिकाणी टेंट उभारल्यास पाणी साचण्याचा धोका असतो. तंबू उभारण्यासाठी नेहमी जमिनीपासून थोड्या उंचीवर सपाट आणि कोरडी जागा निवडा.

आग आणि अन्न सुरक्षा

पावसाळ्यात कॅम्पफायर बनवणे कठीण असू शकते, म्हणून तुमच्यासोबत वॉटरप्रूफ लाइटर आणि कोरडे लाकूड ठेवा. अन्नपदार्थ देखील आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी हवाबंद डब्यात पॅक करणे आवश्यक आहे. 

फास्ट ड्राय फॅब्रिकचे कपडे घालावेत. 

पावसात भिजल्यावर सुटी कपडे होतो. पावसात भिजल्यावर लवकर सुकू शकतील, अशा फॅब्रिकचे कपडे निवडा. तुम्ही नायलॉन किंवा पॉलिस्टरसारखे जलद सुकणाऱ्या फॅब्रिकचे कपडे घाला. जेणेकरून तुमचे शरीर लवकर सुकेल आणि शरीराला थंडी भेदणार नाही. 

कोरडी बॅग आणि रेनकोट 

कॅम्पिंग करताना तुमच्यासह मोबाईल, पॉवर बँक, कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी एक कोरडी बॅग नक्की ठेवा. तुमच्यासोबत एक वॉटरप्रूफ बॅग ठेवा, जेणेकरून पावसात भिजल्यास तुमची बॅग किंवा आवश्यक सामान खराब होणार नाही. याशिवाय, एक हलका रेनकोट आणि वॉटरप्रूफ जॅकेट सोबत ठेवणे देखील उपयुक्त ठरेल. 

image credits: gettyimages