"लवकर निजे लवकर उठे, त्यासी आरोग्य लाभे..." हे वाक्य आपण लहानपणीपासून ऐकत आलो आहोत. पण आजकाल बहुतेक लोक लवकर उठायला कंटाळा करतात. खरं तर, सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे, हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. पण, आपणा सर्वांना माहितीच आहे की, सध्याची तरुणाई रात्री उशिरापर्यंत जागरण करत असते. कुणी अभ्यासासाठी, कुणी कार्यालयीन कामासाठी तर, कुणी आपल्या फोनवर मनोरंजन म्हणून रात्री उशिरापर्यंत सिरीज, सोशल मीडिया पाहत असतात. मात्र, रात्री उशिरापर्यंत जागरणाचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होऊ शकतो.
Also Read: Blue Skincare: कॉस्मेटिक विश्वात धुमाकूळ घालतोय ब्लु स्किनकेयर ट्रेंड, काय आहे विशेष?
सकाळी लवकर उठण्यासाठी सोप्या टिप्स
रात्री लवकर झोपल्याने शरीराला चांगली विश्रांती मिळेल आणि सकाळी लवकर उठणे सोपे होईल. जर तुम्ही पहाटे 2 वाजता झोपलात तर तुम्ही सकाळी 10 वाजता उठाल, पण जर तुम्ही सकाळी 10 वाजता झोपलात तर सकाळी 6 वाजता उठणे सोपे होईल. झोपण्यापूर्वी लॅपटॉप, मोबाईल इ. तुमच्यापासून लांब जागेवर ठेवा. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे, पचनसंस्था आणि झोपेचे हार्मोन तयार करण्यासाठी उपयुक्त असते.
- सकाळी पहिला गजर 'अलार्म' वाजताच उठा. फोन तुमच्यापासून लांब ठेवा, म्हणजे तुम्हाला उठून अलार्म बंद करावे लागेल. पहिले 5-10 मिनिटे कठीण असतात, ते पार केल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटेल.
- सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम चेहऱ्यावरून पाणी घ्या आणि ताज्या हवेत फिरायला जाऊ शकता.
- दुपारी लवकर जास्त झोपणे टाळा कारण त्यामुळे रात्रीची झोप बिघडते. तुम्ही केवळ 15-20 मिनिटांचा पॉवर नॅप घेऊ शकता.
- रात्री लवकर झोप येण्यासाठी हलके अन्न खा. जेवल्यानंतर चालायला विसरू नका.
- याशिवाय झोपण्यापूर्वी एक किंवा दोन तास आधी मोबाईल, टीव्ही आणि फोनपासून स्वतःला दूर ठेवा.
मनाची तयारी
सकाळी लवकर उठण्यासाठी स्वतःला एक मजबूत कारण द्या. जसे की योगा करणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे, फिरायला जाणे किंवा छंद जोपासणे. तुम्हाला असा अनुभव आला असेल की, कधी तुम्हाला एखादे महत्त्वाचे काम (जसे की फ्लाईट पकडणे) करायचे असेल तर, तुमची झोप अलार्म आधीच उघडते.
रात्री लवकर झोप येण्यासाठी काय करावे?
सुरुवातीला लवकर झोपणे कठीण असते. त्यामुळे केसर, जायफळ किंवा मध मिसळलेले दूध पिल्याने झोप येण्यास मदत होईल. तर, कॅमोमाइल हर्बल चहा देखील चांगला आहे. झोपण्यापूर्वी तुमच्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्याने किंवा अनुलोम विलोम केल्याने मन शांत होते. वेळ वारंवार तपासल्याने किंवा त्याबद्दल विचार केल्याने ताण वाढतो, त्यामुळे ओव्हरीथिंकींग करू नका.
लवकर उठण्याचे फायदे
> मन आणि विचार नेहमी सकारात्मक असतो. > स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढेल. > जुन्या आजारांचा धोका कमी होतो. > त्वचेवर चमक येईल. > दिवसभर ऊर्जा मिळेल, ज्यामुळे काम लवकर पूर्ण होण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: वरील सर्व माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. मात्र, वरील माहिती तुमच्या हेल्दी लाइफस्टाइलसाठी उत्तम आहे.
IMAGE CREDIT: PEXELS

