उन्हाळ्यात जर तुम्ही ऑफिसला, कॉलेजला किंवा अन्य काही कारणांसाठी सतत बाहेर जात असाल तर, तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग होणे सामान्य आहे. टॅनिंगमुळे तुमचा चेहरा एक टोन सावळा दिसायला लागतो. एवढेच नाही तर, तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो देखील नाहीसा होतो. यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे प्रोडक्ट्स वापरतो, पण ते केमिकलयुक्त असल्यामुळे चेहऱ्याला हानि होण्याची शक्यता असते. मात्र, जर तुम्हाला टॅनिंगच्या समस्येपासून नैसर्गिकरित्या सुटका हवी असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पपईद्वारे तुमचा चेहरा टॅनमुक्त करू शकता.
Also Read: उन्हाळ्यातही दीर्घकाळ टिकेल तुमचा मेकअप, फॉलो करा 'या' महत्त्वाच्या टिप्स
'अशा'प्रकारे बनवा पपई फेस पॅक
- सर्वप्रथम एका भांड्यात पिकलेली पपई नीट मॅश करून घ्या. आता त्याच भांड्यात थोडे मध घ्या.
- त्यानंतर, यामध्ये थोडे दूध घ्या आणि या सर्व नैसर्गिक गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करा.
- आता या सर्व मिश्रणाचे एक स्मूथ पेस्ट तयार करावी लागेल. यासह तुमचा केमिकल फ्री फेस पॅक तयार आहे.
वापरण्याची योग्य पद्धत
- पपईचे केमिकल फ्री फेस पॅक तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावून घ्या.
- सुमारे 20 मिनिटे हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवा, या कालावधीत हे मिश्रण चेहऱ्यावर उत्तम परिणाम देईल.
- 20 मिनिटे झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच धुवून घ्या. चेहरा धुण्याआधी तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला पहिल्याच युजमध्ये पॉझिटिव्ह रिजल्ट मिळेल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे फेस पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून घ्या.
डिस्क्लेमर: वरील संपूर्ण माहिती सामान्य ज्ञानाकरीता आहे. जर तुम्हाला या माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करायचा असेल तर, आधी तुमच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.
Image source: gettyimages.in


