Nag panchami 2025: हिंदू धर्मात नाग जातीलाही देवाचे स्थान दिले गेले आहे. आज 29 जुलै 2025 रोजी नागपंचमी आहे. होय, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा मुहूर्त असतो. नागपंचमी देशातील विविध राज्यांमध्ये अगदी भक्तिभावाने साजरी केली जाते, या दिवशी नागदेवतेची योग्य विधीने पूजा केली जाते. पण तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल की, नागपंचमी साजरी का करतात? याबद्दल इतिहास जाणून घ्यायचाय ना.... चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊयात रसिक इतिहास-
Also Read: Shravan Somvar: आज श्रावणाचा पहिला सोमवार! का करतात उपवास? उपवासाला आहार म्हणून काय खावे?
नागपंचमी का साजरी करतात?
हिंदू परंपरेतील धार्मिक श्रद्धेनुसार नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो, असे मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते, असे म्हटले जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये नागपंचमीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. तुम्ही लहानपणी महाभारतातील काही कथा ऐकल्या असतील. त्यातील एक म्हणजे राजा परीक्षितचा मुलगा जनमेजय याने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदल सर्प यज्ञ केला होता. त्यानंतर नागांचा नाश झाला. पण आई उत्तरेच्या सांगण्यावरून ऋषी आस्तिक यांनी यज्ञ थांबवला.
अशाप्रकारे नागांचे रक्षण झाले, ज्यादिवशी हे सर्व घडले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.
नागपंचमीचे महत्त्व
सुरुवातीपासूनच आपण मानत आलो आहोत की, नाग लोकांची विशेष वस्ती नागलोक अस्तित्वात आहे. नागपंचमीच्या दिवशी नागलोकात विशेष उत्सव असतो, अशी मान्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी जो कुणी नागाला गायीच्या दुधाने स्नान घालतो, त्याच्या कुळाचे नागदेवता सदैव रक्षण करतात. या व्यतीच्या कुटुंबाला सर्पांकडून कोणतीही हानी होण्याची भीती नसते.
डिस्क्लेमर: वरील माहिती ऐकीव आणि काही पुस्तकांमधून पुढे आली आहे. वाचकांना इतिहासाची कल्पना व्हावी, हाच यामागील उद्देश आहे.
image credit: adobe stock