Shravan Somvar: आज श्रावणाचा पहिला सोमवार! का करतात उपवास? उपवासाला आहार म्हणून काय खावे?

नुकतेच श्रावण महिना सुरु झाला असून आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे. श्रावण महिन्यात अनेकजण महादेवाच्या नावाने उपवास करतात. या महिन्यात कुणी आठवड्यातील एक दिवस तर कुणी महिनाभर उपवास करतात. सोमवार हा महादेवाचा वार समजला जातो, त्यामुळे अनेकजण श्रावणी सोमवारचा उपवास ठेवतात. विशेषतः महिला आणि अविवाहित मुली हा उपवास करतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात श्रावणी सोमवारच्या उपवासाचे महत्त्व आणि या उपवासाला काय खावे?

Also Read: आहाहा...! उन्हाळ्याच्या गर्मीत तुमचा आत्मा तृप्त करण्यासाठी घरीच बनवता येतील चविष्ट '5' समर ड्रिंक्स 

श्रावणी सोमवारचा उपवास का करतात? 

प्रत्येक श्रावणी सोमवारला महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. श्रावण महिन्यात शिव-पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना मानले जाते. असे म्हणतात की, अविवाहित मुलींनी हा उपवास केल्यास त्यांना मनासारखा वर मिळतो. तर, विवाहित महिला आपल्या पतीच्या उत्तम स्वास्थ आणि दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करतात. श्रावणातील महादेवाचे पूजा खूप फलदायी असते, असे मानले जाते. 

श्रावण महिन्याची कथा 

देवी सतीने पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीर त्यागले होते. मात्र, त्याआधी देवी सतीने शंकर प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळावे, असे प्रण केले होते. देवी सतीने तिच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल यांच्या घरी जन्म घेतला. देवी पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले. त्यांनतर त्यांचा विवाह झाला. अशाप्रकारे श्रावण महिना महादेवाचा उपासनेसाठी विशेष झाला. म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे, श्रावणात अविवाहित मुली सुयोग्य वर मिळावा म्हणून सोमवारी व्रत करतात. 

उपवासाला आहार म्हणून काय खावे? 

दही बटाटे: श्रावणी सोमवारच्या उपवासाला तुम्ही दही बटाटे असा आहार घेऊ शकता. उकडलेल्या बटाट्यांमध्ये सैंधव मीठ टाकून फ्राय करा आणि ताज्या दह्यासोबत खा. 

साबुदाणा खीर: उपवासाला साबुदाण्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. खिचडी, थालीपीठ, साबुदाण्याचे वडे इ. अनेक पदार्थ बनवता येतात. त्यापैकी साबुदाण्याची खीर एक चांगला आहे, ही खीर केवळ चविष्टच नाही तर यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळेल. 

सिंघाड्याचा हलवा: सिंघाड्याचा हलवा केवळ तुमच्यासाठी पौष्टिकचा नाही तर, चविष्ट देखील आहे. हलवा बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप गरम करून सिंगाड्याचे पीठ भाजून घ्या. आता त्यात दूध घालून मिक्स करा आणि साखर किंवा गुड घालून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. हलव्यावर केसर-बदाम घालून तुम्ही हे उपवासाला खाऊ शकता. 

कंदाची चाट: कंद म्हणजेच गोड बटाटे यांची चाट देखील उपवासासाठी उत्तम पर्याय आहे. सर्वप्रथन गोड बटाटा उकळून घ्या आणि छोटे तुकडे करा. यात काळे मीठ, जिरे पूड आणि लिंबाचा रस घाला. आता त्यात वर कोथिंबीर घालून सर्व्ह करता येईल. याच्या सेवनाने तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही. याशिवाय, तुम्हाला उपवासाला फलाहार देखील घेऊ शकता. 

image credit: adobe stock