मासिक पाळी म्हणजेच पिरेड्समध्ये पोटात नेहमी वेदना होणे, ही अनेक महिला आणि मुलींची तक्रार असते. या वेदनेला 'पिरेड्स क्रॅम्प्स' असे म्हणतात. काही वेळा या वेदना इतक्या असह्य असतात की, त्यासाठी टॅब्लेट्स किंवा पेनकिलर्सची आवश्यकता पडते. पण मासिक पाळीदरम्यान गोळ्या किंवा पेनकिलर्स खाणे योग्य नाही, असा डॉक्टरांचा सल्ला असतो. क्रॅम्प्सपासून मुक्त होण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीचा वापर देखील केला जातो. मात्र, अशा काही थेरेपीज देखील आहेत, ज्याद्वारे पिरेड्स क्रॅम्प्सचा त्रास जाणवणार नाही. या रिपोर्टमध्ये आज आम्ही तुम्हाला अशाच काही थेरेपीजबद्दल माहिती देणार आहोत.
Also Read: तुम्हालाही तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवायची आहे? आहारात करा 'या' फळांचा समावेश
पिरेड्स क्रॅम्प्स का होतात?
जेव्हा महिलांना मासिक पाळी सुरू होते तेव्हा शरीरातील गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात. या आकुंचनामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि वेदना होण्यास सुरुवात होते. त्याबरोबरच, हार्मोनल बदल देखील यामध्ये मोठी भूमिका बजावतात.
मात्र, आजच्या महिला त्यांच्या शरीराच्या गरजा समजून घेत आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःला सक्षम बनवत आहेत. जर तुम्हालाही दरमहा या वेदनांचा त्रास होत असेल, तर एकदा पुढील थेरेपीज घेऊन पहा. जाणून घ्या सविस्तर-
TENS (Transcutaneous Electrical Nerve Stimulation) थेरपी
या थेरपीमध्ये एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे कंबरेवर किंवा पोटाच्या खालच्या भागात घातले जाते. ते सौम्य विद्युत सिग्नल पाठवते, जे तुमच्या नसांना आराम देतात आणि वेदना जाणवतात. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, TENS उपकरणे आता ऑनलाइन आणि भारतातील मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. या उपकरणांचे रिव्युज तपासूनच खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा.
थर्मल पॅच आणि ऍक्युप्रेशर बेल्ट
आजकाल हिट देण्यासाठी ऍक्यूक्युप्रेशर बेल्ट किंवा थर्मल पॅचेस खूप लोकप्रिय आहेत. हे बेल्ट शरीराच्या काही विशिष्ट ठिकाणी दाब देतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि वेदनांपासून आराम मिळतो. थर्मल पॅचेस शरीरात खोलवर उष्णता देतात, ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. हे उपाय विशेषतः अशा लोकांसाठी चांगले आहेत, ज्यांना औषध घ्यायला अजिबात आवडत नाही.
अरोमा थेरेपी आणि इसेन्शियल ऑईल्स
अलीकडेच अनेक महिला अरोमा थेरेपी वापरतात. लॅव्हेंडर, क्लेरी सेज आणि पेपरमिंट सारख्या आवश्यक तेलांना पोटावर हलके मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळतो. एवढेच नाही तर, तुमचा मूड देखील चांगला आणि फ्रेश होतो. कधीकधी मासिक पाळीच्या वेदनांसोबत चिडचिड किंवा तणाव देखील येतो. अरोमा थेरपी या समस्यांसाठी देखील लाभदायी आहे.
डिस्क्लेमर: वरील माहिती तुमच्या सामान्य ज्ञानाकरिता आहे. जर तुम्हाला या माहितीचा वापर दैनंदिन जीवनात करायचा असेल तर, सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.