| image credit: you tube |
Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमी म्हणजे उत्साहाचा सण असतो. सर्व कृष्ण-भक्तीणी जन्माष्टमीच्या जय्यत तयारीला लागल्या आहेत. फराळ बनवण्यापासून ते जन्माष्टमीच्या सजावटीपर्यंत सर्व गोष्टींची तयारी सुरु आहे. या दिवशी राधा राणी सारखे नटून थाटून तयार व्हावे, असे प्रत्येक भारतीय मुलीला वाटते. सुंदर लेहेंगा घालणे, दागिने घालणे, मेहेंदी लावणे, इ. अनेक प्रकारे सर्व जणी तयार होतात. जर तुम्ही या खास प्रसंगासाठी काही सोप्या आणि साध्या मेहंदी डिझाइन शोधत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. तुम्ही पुढील दिलेल्या डिझाइन्स मधून सर्वोत्तम डिझाईन निवडू शकता.
Also Read: छोटे डोळे मोठे दिसण्यासाठी 'अशा'प्रकारे करा आय मेकअप, जाणून घ्या आकर्षक टिप्स
कमल
ग्रिड डिझाईन
मागच्या हाताची ही ग्रिड डिझाइन देखील खूप सोपी आहे. यामध्ये प्रथम चौकोनी आकार तयार करा आणि नंतर त्यावर बिंदी लावा. वरील चित्राप्रमाणे डिझाईन तयार करा, अशा प्रकारे संपूर्ण ग्रिड तयार होईल. ज्याच्या मध्यभागी तुम्ही साधे लहान हृदय डिझाइन बनवू शकता. ही डिझाइन खूप छान दिसेल.
बॅक हॅन्ड
मागच्या हातासाठी देखील तुम्ही हे कमळाचे डिझाइन बनवू शकता. वरच्या बाजूला कमळाचे चिन्ह आहे जे खूप शाही लूक देत आहे. बोटांवर सुंदर पाने बनवलेली आहेत आणि कमळाच्या बारीक डिझाइनसह उर्वरित जागा बोटांच्या खालच्या बाजूला बॉर्डर डिझाइनसह भरली आहे.
मंडला पॅटर्न
भरीव
जर तुम्हाला खूप समृद्ध आणि पारंपारिक मेहंदी डिझाइन हवी असेल तर, पानांचे, गोल आणि जाळीचे डिझाइन काढता येईल. जे तळहाताला पूर्णपणे भरीव आणि खूप चांगले दिसेल. यात गडद शेडिंग आणि मोटिफ डिझाइन आहे, जे सोपे आणि शाही टच देते.
गोल सिम्पल डिझाईन
जर तुम्हाला मेहंदी लवकर लावायची असेल आणि ती खूप सोपी असेल तर ही डिझाईन ट्राय करा, ज्यामध्ये तळहाताच्या मध्यभागी एक गोल आकार भरला गेला आहे आणि वर एक साधी डिझाईन बनवून मंडल पूर्ण केले आहे. बोटांवर साध्या वेली लावल्या आहेत आणि मनगटावरही अशीच डिझाईन बनवली आहे.
इतर आकर्षक डिझाईन्स तुम्ही या जन्माष्टमीला काढू शकता.
राधा-कृष्णाची मेहंदी: राधा आणि कृष्णाच्या प्रेमळ जोडीची मेहंदी खूप खास आणि लोकप्रिय आहे.
बासरीची मेहंदी: सुंदर बासरी कृष्णाचे एक महत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे बासरीची मेहंदी देखील खूप सुंदर दिसते.
मोरपंखी मेहंदी: कृष्णाच्या मुकुटावरील मोरपंखी डिझाईन्स नेहमीच आकर्षक दिसतात. तुम्ही ते तळहातावर काढू शकता.
श्रीकृष्णाची मेहंदी: कृष्णाचे चित्र, बालकृष्णाचे चित्र किंवा कृष्णाच्या विविध रूपांची मेहंदी लावू शकता.
image credit: mehndidesigns_collection (Instagram)