Raksha Bandhan 2025: प्रत्येक भाऊ-बहिण रक्षाबंधनाची आतुरतेने वाट पाहतात. आज 9 ऑगस्ट 2025 रोजी बहीण भावाच्या नात्यातील गोडवा साजरा केला जाईल. गेल्या काही काळापासून प्रत्येक बहीण आणि भाऊ जरा बिझीच असतात. राखीची खरेदी करणे, घरी पाहुणे येण्याची व्यवस्था करणे, ज्यामध्ये काहीतरी किंवा दुसरे राहून जाते. भाऊ आपल्या बहिणीला काय द्यावे जेणेकरून तिच्या चेहऱ्यावर हास्य येईल याचा विचार करतात. पण अनेकदा सणाच्या तयारीत आणि गडबडीत भेटवस्तू खरेदी करणे राहून जाते.
तुम्ही देखील अशा अडचणीत असाल तर, काही काळजी करू नका. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला गिफ्टच्या काही खास आयडीयाज देणार आहोत. होय, यासह तुमची बहीण आनंदाने उड्या मारायला सुरुवात करेल.
टेस्टी हेल्दी कॉम्बो
ऐन वेळी तुम्ही तुमच्या बहिणीच्या आवडीचे चॉकलेट, कुकीज आणि काही कुरकुरीत हेल्दी स्नॅक्स ऑर्डर करू शकता. आजकाल, असे अनेक फूड डिलिव्हरी ऍप्स आहेत, जे फक्त 10 ते 15 मिनिटांत घरापर्यंत सामान पोहोचवतात. अशा परिस्थितीत, तुम्ही एक चांगला कॉम्बो बनवून गिफ्ट हॅम्पर देऊ शकता.
मुव्ही
बहिणीसोबत कॉलिटी टाइम घालवणे, हे सर्वोत्तम गिफ्ट आहे. यासाठी सर्वोत्तम कल्पना म्हणजे एकत्र तुमच्या आवडीचे कॉमेडी मुव्हीज बघणे. खरं तर, तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी बाहेर देखील जाऊ शकता. पण, सणाच्या निमित्ताने घरी पंचपक्वान्न शिजवलेले असते. आम्ही बहीण-भाऊ टीव्हीवर 'कार्टून्स' पाहताना कॉलिटी टाइम स्पेंट करतो.
स्पा अपॉइंटमेंट
जर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करायला विसरला असाल, तर तुम्ही तिच्यासाठी भारी स्पा अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे गिफ्ट ऐकल्यावर तुमची बहीण आनंदाने उड्याचं मारेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बहिणीचे लाड देखील करू शकाल, ज्यामुळे तुम्हालाही आनंद होईल.
सॉफ्ट टॉईज
बहीण कितीही मोठी झाली तरी तिला टेडी बेयरसारख्या सॉफ्ट टॉईजसोबत खेळायला आवडते. काही जणी तर सॉफ्ट टॉईज घेऊन छान शांत झोप घेतात. सॉफ्ट टॉईजसाठी तुम्हाला फार लांब जाण्याच्या गरज नसते. तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही गिफ्ट शॉपमधूनही या गोष्टी खरेदी करू शकता. तसेच, परफ्यूम्स आणि ज्वेलरी सेट्सचे एक गिफ्ट हॅम्पर देखील तुम्ही तयार करू शकता.
image credit: pexels