Raksha Bandhan Gift ideas 2025: रक्षाबंधनला लाडक्या बहिणीला द्या 'युनिक' गिफ्ट्स, असा साजरा करा नात्यातील गोडवा
Raksha Bandhan Gift ideas 2025: रक्षाबंधनाच्या सणाला बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा साजरा करतात. वर्षभरापासून प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी नावाचा रेशमी धागा बांधण्यासाठी आतुर असते. यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे. रक्षाबंधला भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. बहीण भावाचा हा सण घरात एक वेगळाच उत्साह घेऊन येतो. मात्र, रक्षाबंधनाला बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, हा प्रश्न प्रत्येक भावाला पडत असेल. कारण गिफ्ट भावनिक, आकर्षक आणि विशेष असावे, असे प्रत्येकाला वाटते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला उत्तम गिफ्ट आयडियाज देणार आहोत.
जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटवस्तू देता तेव्हा हे लक्षात ठेवा की ती भेट अशी असावी की ती दुसऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त असेल आणि ती अशी नसावी जी ते फक्त उचलून बाजूला ठेवतात. जर तुम्हाला माहित असेल की, तुमच्या बहिणीला सर्वात जास्त काय हवे आहे, तर ही सर्वोत्तम कल्पना असू शकते.
टूर प्लॅनिंग
रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या कामापासून कंटाळलेल्या बहिणीचा मूड चियर करण्यासाठी एक-दोन दिवसांचे छोटे टूर देखील प्लॅन करू शकता. हे तुमच्या लाडक्या बहिणीसाठी बेस्ट गिफ्ट ठरेल. अशाने तिचा मूड उत्साही तर होईलच पण तुम्हाला देखील काम, ताणतणावापासून एक चांगला ब्रेक मिळेल. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या बहिणीसह रक्षाबंधन पद्धतीने साजरा करा.
स्किनकेयर अँड कॉस्मेटिक्स
बहिणीला खुश करण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे मेकअप आणि कॉस्मेटिक्स. हो, तुम्ही तुमच्या बहिणीला उत्तम प्रतीचे कॉस्मेटिक्स देऊ शकता. याशिवाय, जर तुमचे बजेट चांगले असाल तर, तुम्ही त्वचेच्या टेक्सचरनुसार स्किन केअर किट भेट देऊ शकता. आजकाल बरेच ब्रँड्स रक्षाबंधनला कॉस्मेटिक्स गिफ्ट हॅम्पर आणि स्किनकेयर किट तयार करतात.
कस्टमाइज गिफ्ट्स
या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला तिचे नाव लिहिलेला फोटो, ब्रेसलेट, मग, गादी किंवा फोटो फ्रेम इ. कस्टमाइज वस्तू गिफ्ट करू शकता. या भेटवस्तू भावा-बहिणीमधील प्रेम अधिक दृढ बनवतात. याद्वारे तुमच्या रक्षाबंधनाचा प्रसंग आणखी खास आणि संस्मरणीय बनेल.
ड्रेस
या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला एक आकर्षक ड्रेस देखील गिफ्ट करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ट्रेंडी डिझाइन ड्रेस खरेदी करू शकता. तुम्ही तिला कॉलेज किंवा ऑफिसमध्ये घालण्यासाठी एक फॅन्सी कुर्ती सेट, क्लासी साडी, रेडिमेड साडी, वेस्टर्न ड्रेस इ. पर्यायांपैकी ड्रेस गिफ्ट करू शकता.
image credit: adobe stock

