| image credit: getty images |
साधारणतं मुली 12 ते 13 वयवर्षांच्या झाल्यानंतर त्यांना मासिक पाळी म्हणजेच पिरियड्स येणे सुरु होते. नवीन मुलींना तसेच त्यांच्या पालकांना या परिस्थितीला कसे हाताळावे? हे लगेच कळत नाही. मासिक पाळीबद्दल चर्चा करणे अजूनही अनेक ठिकाणी टाळले जाते. परंतु ही गोष्ट थेट महिलांच्या आरोग्याशी जोडलेली आहे, म्हणूनच मुलींना त्यांच्या किशोरावस्थेत येणाऱ्या बदलांबद्दल शिक्षित आणि मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे. जर तुमची मुलगी सुद्धा किशोरावस्थेत प्रवेश करत असेल तर, तुम्ही पुढील महत्त्वाच्या गोष्टी तिला समजावून सांगितले पाहिजे.
Also Read: पिरेड्समध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळावा म्हणून महिला घेतात 'या' थेरेपीज, जाणून घ्या सविस्तर
पिरियड्स आल्यावर मुलींना मूड स्विंग्स, पोटदुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. होय, हा काळ हार्मोनल बदलांवर अवलंबून असतो. परंतु तुमच्या लहान मुलीला याबद्दल काही मूलभूत माहिती आधीच देणे महत्वाचे आहे. अशाप्रकारे ती ते नैसर्गिकरित्या तिच्या आयुष्यातील एक सामान्य बदल म्हणून स्वीकारू शकेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात किशोरावस्थेत आलेल्या मुलींना मासिक पाळीबद्दल कसे मार्गदर्शन करावे?
पिरेड्स येणे नॉर्मल आहे.
सर्वप्रथम तुमच्या मुलीला सांगा की, मासिक पाळी ही मुली आणि महिलांमध्ये एक नॉर्मल प्रक्रिया आहे. प्रत्येक स्त्रीला याचा अनुभवायला मिळते. या काळात होणाऱ्या वेदना, पोटदुखी आणि मूड स्विंग्ससारख्या समस्यांबद्दल काळजी करू नये. उलट असे काही झाल्यास, ती तुमच्याशी उघडपणे शेअर करू शकते. यामुळे तुमच्या मुलाचे मासिक पाळीबद्दलचे आवश्यक ज्ञान वाढेल.
हायजिनवर लक्ष द्या.
किशोरावस्थेच्या काही काळापूर्वीच प्यूबिक हेयर्स येऊ लागतात. यासाठी तुमच्या मुलीला योग्य स्वच्छतेबद्दल शिक्षित करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासह, पिरियड्स सुरु असताना त्या भागाची स्वच्छता कशी राखायची, दररोज स्वच्छ अंडरवेअरचा वापर, गुप्तांग स्वच्छ करणे आणि पिरियड्स दरम्यान पॅड वापरणे. या सर्व मूलभूत गोष्टींबद्दल मुलींना शिक्षित करणे महत्त्वाचे आहे.
शारीरिक बदल
पिरियड्स सुरु झाल्यावर मुलींमध्ये शारीरिक बदल होण्यास सुरुवात होते. जसे की, स्तनांची कोमलता आणि शरीराच्या आकारात बदल होतात. म्हणून, या काळात त्यांना ड्रेसिंग स्टाईलबद्दल शिक्षित करणे, महत्त्वाचे आहे. परिस्थितीनुसार मुलींना शारीरिक बदलांवर आधारित कपडे कसे निवडायचे ते सांगा.
महत्त्वाचे
- मासिक पाळी 3 ते 5 दिवसांपर्यंत असू शकते आणि काही मुलींसाठी, सुरुवातीच्या महिन्यांत ती 6 ते 7 दिवसांपर्यंत असू शकते.
- पिरियड्स सायकल 21 ते 35 दिवसांपर्यंत असते. या काळात लाल किंवा किंचित गडद रक्तस्त्राव होऊ शकतो, परंतु घाबरू नका.
- जर तुमची मासिक पाळी अचानक सुरू झाली तर घाबरू नका, त्याऐवजी मदत घ्या. जर तुम्ही शाळेत असाल तर मैत्रिणीला किंवा तुमच्या शिक्षिकेला त्याबद्दल सांगा.
- तुमच्या मुलीला सांगा की, तिच्या पिरियड्सच्या तारखा लक्षात ठेवाव्यात. त्या तारखांवर ती सॅनिटरी नॅपकिन्स, टिश्यूज इ. आपल्या सोबत ठेऊ शकते. तसेच, इतर मुलींना अडचणीच्या वेळी मदत देखील करू शकते.
- जर तुमच्या मुलीच्या पिरियड्समध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गंभीर समस्या जाणवत असतील तर, डॉक्टरांचा किंवा गायनॅकोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्यावा.
image credits: pexels.