अनहेल्दी डाएट आणि तशाच लाइफस्टाइलमुळे शरीरात अनेक समस्या होत असतात. त्यामध्ये तुमचे 'वजन वाढणे' ही एक मोठी समस्या आहे. बरेच दिवस आपण आपल्या वाढत्या वजनाकडे अजिबात लक्ष देत नाही. पण एकदा का वजन वाढले तर ते कमी व्हायचे नाव घेत नाही. जेव्हा आपण एखाद्या सेलिब्रिटीची फिटनेस बघतो, तेव्हा न राहवून प्रश्न पडतो की, कमी वेळात अखेर वजन कमी कसे करावे? तर काळजी करू नका. अलीकडेच सुप्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंहने वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. सिद्धार्थने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.
आजकाल अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. होय, तमन्नाच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनने अनेकांना प्रेरणा दिली आहे. मात्र, तमन्ना परिपूर्ण फिगर मिळवण्यासाठी फार काही करत नाही. ती फक्त योग्य तंत्रे वापरते. तिचे फिटनेस ट्रेनर, सिद्धार्थ सिंग देखील सहमत आहेत की, वजन कमी करणे आपल्याला वाटते तितके अवघड नाही.
सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वजन कमी करण्याचे तीन सोपे मार्ग सांगितले आहेत. हे उपाय तुम्ही तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता.
वजन कमी करण्यासाठी तमन्नाच्या ट्रेनरने सांगितले 3 सोपे उपाय
तमन्नाच्या फिटनेस ट्रेनर सिद्धार्थने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तो सांगत आहे की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर, तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत तीन सवयी निश्चितपणे समाविष्ट कराव्यात. असे केल्याने तुम्ही 90 दिवसांत 5 ते 10 किलो वजन सहज कमी करू शकता.
1. प्रत्येक मिलमध्ये प्रोटीनचा समावेश
प्रोटीन केवळ स्नायूंच्या वाढीसाठीच नव्हे तर, तुमचे पोट दीर्घकाळापर्यंत भरून राहण्यासाठी देखील आवश्यक आहेत. यासाठी तुम्ही तुमच्या मिलमध्ये अंडी, चीज आणि चिकनसह प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहील आणि भूक कमी होईल.
2. भरपूर पाणी प्या.
अनेकदा तुमची तहान म्हणजे भूक समजली जाते. सिद्धार्थ सांगतो की, तुम्हाला जेव्हा भूक लागल्यासारखी होते, तेव्हा तुम्ही अनेकदा फक्त तहानलेले असता. भरपूर पाणी प्यायल्याने तुमची भूक नियंत्रित होण्यास मदत होईल. यासह वजन कमी करणे देखील सोपे होईल. जेवणापूर्वी एक ग्लास पाणी पिल्याने तुमचे अन्न सेवन कमी होण्यास मदत होऊ शकते. हे तुमचे डायजेशन राखण्यास देखील उपयुक्त आहे.
3. व्यायाम करणे.
व्यायाम करणे म्हणजे फक्त कॅलरीज बर्न करणे नाही. व्यायाम केल्याने शरीराला टोन आणि बिल्ड करण्यास मदत मिळते. सिद्धार्थने सांगितले की, दिवसभर सोफ्यावर पडून राहिल्याने वजन कमी होणार नाही, तर ते वजन अधिक वाढेल. म्हणून, तुमचा आळस सोडून द्या आणि व्यायाम करा. हळूहळू व्यायाम करण्याची सवय लावा आणि दररोज थोड्या वेळासाठी कोणताही ब्रेक न घेता व्यायाम करा.