डोळे दिसतील आणखी आकर्षक! 'या' टेक्निकसह करा पापण्यांना कर्ल, काय सांगतात एक्सपर्ट्स?

मेकअप करताना डोळे हायलाईट करणे हे सर्वात मजेशीर आणि अवघड काम आहे. डोळ्यांना हायलाईट केल्याने तुमचे डोळे आणि चेहरा आणखी आकर्षक दिसतात. एवढेच नाही तर, आकर्षक डोळ्यांनी तुम्ही कुणालाही सहज भूल पाडू शकता माहितीये ना? 😉... पण या लेखात आम्ही डोळ्यांनी भूल कशी पडायची हे नाही तर डोळे आणखी आकर्षक कसे होतील, यावर माहिती देणार आहोत. डोळ्यांचे मेकअप आणि शेप देण्याशिवाय पापण्यांना कर्ल करणे देखील महत्त्वाचे आहे. होय, या लेखात आम्ही तुम्हाला पापण्यांना कर्ल करण्याच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत. ही पद्धत एका एक्सपर्टने सांगितली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात सविस्तर माहिती- 

Also Read: नक्की वाचा! डोळे अधिक आकर्षक दिसावेत म्हणून 'या' काही विशेष मेकअप टिप्स...

लॅश कर्लिंगसाठी सोपी पद्धत 

पापण्यांना कर्ल करण्याची प्रत्येक आर्टिस्टची एक स्वतःची पद्धत असते. परंतु क्लायंटवर किंवा स्वतःवर सहजपणे लॅश कर्लिंगसाठी पापण्या कुरळ्या करण्यासाठी एक टेक्निक आहे. ही टेक्निक वर्षानुवर्षे अनुभवावरून चाचणी केलेली एक पद्धत आहे, असे सांगितले जाते. 

- तुम्ही नेहमी कात्री पकडता, तसेच कर्लर पकडा. त्याआधी तुमचे टूल, स्ट्रिपसह सॅनिटाइज करून स्वच्छ करून घ्या.

- आता कर्लर पूर्णपणे ओपन करा. कर्लर वरच्या पापण्यांपर्यंत आणा, स्ट्रिप्स पापण्यांच्या जरा मुळापर्यंत न्या. आता सर्व पापण्या कर्लरच्या आत आहेत का ते तपासा. टूल सरळ ठेवा जेणेकरून कर्व बाहेरील बाजूस असेल.

- पापण्यांवर कर्लर काळजीपूर्वक बंद करा आणि मऊ, स्पंदित करणारी पकड वापरून हलके दाबा.

- आता कर्लर वरच्या दिशेने वळवा जेणेकरून कर्लरचा कर्व तुमच्या पापण्यांच्या क्रीजच्या कर्वशी जुळेल. हे त्याचे गुपित आहे. यामुळे तुम्हाला क्रिंप इफेक्टऐवजी कर्ल मिळेल.

तुम्ही या माहितीच्या आधारे युट्युबवर व्हीडिओ सर्च करून लॅश कर्लिंगची पद्धत बघू शकता. 

टिप: जर तुम्हाला वरील माहितीचा अवलंब करायचा असेल तर, आधी एक्सपर्ट्सकडून सल्ला घेणे आवश्यक आहे. 

image credit: pexels