बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका आणि कतरीनासारखी फिटनेस असावी, असे कुणाला नाही वाटत. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट यास्मिन कराचीवाला सोशल मीडियावर निरोगी खाण्याच्या आणि वजन कमी करण्याच्या टिप्स शेअर करत असते. अलीकडेच, तिने वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी दिवसा चिप्स किंवा कुकीजऐवजी कोणती निरोगी गोष्ट खाऊ शकता, यासाठी एक व्हीडिओ शेअर केला. यामध्ये फिट राहण्यासाठी ती स्वतः कोणत्या पद्धतींचा अवलंब करते, याबद्दल तिने माहिती दिली आहे.
Also Read: All time favorite national crush 55 years old Preity Zinta reveals her fitness secret
यास्मिनचे हेल्दी टिप्स
आपणा सर्वांना हे जाणवतच असेल की, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरनंतरही काहीतरी खावेसे वाटते. अशा परिस्थितीत, आपण चिप्स, कुकीज किंवा तळलेले काहीतरी खातो. हे तुमच्या आरोग्यासाठी आणि वाढत्या वजनासाठी फार उत्तम आहे, असे वाटत नाही. पण जर तुमच्याकडे ती भूक भागवण्यासाठी एक स्मार्ट, चविष्ट आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध असेल तर?... तर सोन्याहून पिवळेच नाही का?
दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सारख्या स्टार्सना ट्रेनिंग देणाऱ्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाने अलीकडेच तिचा एक व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये यास्मिनने तिच्या हेल्दी स्नॅकबद्दल माहिती दिली आहे, ज्यामुळे ती दिवसभर एनर्जेटिक असते. तिने सुचवले आहे की, "वजन कमी करण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात ही स्नॅक समाविष्ट करता येईल."
हेल्दी स्नॅक
अलीकडेच शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये, यास्मिनने एका साध्या पण प्रभावी स्नॅकबद्दल सांगितले आहे, जो भूक नियंत्रित करण्यास आणि फिटनेस ध्येये साध्य करण्यास उपयुक्त आहे. बदामांना पोषक तत्वांचा नैसर्गिक भांडार म्हणत यास्मिन म्हणाली की, बदाम प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबीने समृद्ध आहेत. बदाम वजन कमी करण्यासाठी आणि पोट भरून राहण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे अधिक काळापर्यंत भूक लागत नाही.
व्हीडिओमध्ये पुढे, यास्मिनने दुपारच्या जेवणाच्या हव्यासाशी झुंजणाऱ्या लोकांना बदाम खाण्याचा सल्ला दिला आणि तंदुरुस्त राहण्याचा हा एक निरोगी आणि सोपा मार्ग असल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले की, रिसर्चमधेय देखील हा सल्ला देण्यात आला आहे. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या लोकांनी सकाळी बदाम खाल्ले त्यांचे वजन दिवसभर कॅलरीयुक्त स्नॅक्स खाणाऱ्यांपेक्षा कमी होते.
image credit: getty images