दिवाळी ऑफिस पार्टीसाठी हटके लुक हवा? 'हे' इंडो-वेस्टर्न आउटफिट बनवतील तुम्हाला पार्टीची शान

Credit: Instagram/TV9

दिन दिन दिवाळी म्हणता म्हणता दिवाळीचा सण तोंडावर आलाय...सर्व बाजारपेठ आकाशदिवे, रांगोळ्या आणि लाईटिंग्स इ. सर्व साहित्यांनी सजलेल्या आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, दिवाळीला सर्वांनी नवे कपडे घेण्याची पद्धत आहे. पण, आता या पद्धतीला जरा नवे रूप आले आहे. ऑफिसपासून कॉलेजपर्यंत, दिवाळीच्या भव्य पार्ट्या आयोजित केल्या जातात, जिथे लोक पारंपारिक किंवा आकर्षक पोशाख घालतात. पूर्वी फक्त दिवाळी सणाला नवीन कपडे घालायचे इतकंच होत...पण आता तसे नाही. आता दिवाळी पार्टीसाठी वेगवेगळे ड्रेस आणि लूक्स प्लॅन केले जातात. 

जर तुमच्या ऑफिसमध्ये देखील दिवाळीची पार्टी असेल तर, तुम्ही इंडो-वेस्टर्न आऊटफिट ट्राय करू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला इंडो-वेस्टर्न ड्रेसेसच्या काही पॅटर्न्सबद्दल माहिती देणार आहोत. 

दुसऱ्या लूकसाठी तुम्ही श्रद्धा कपूरचा हा लुक कॅरी करू शकता. श्रद्धाने गोल्डन वर्क असलेला ब्लॅक इंडो-वेस्टर्न गाऊन परिधान केला आहे. गाऊनमध्ये एका बाजूला एका खांद्याचा श्रग दिसतोय. हाय बन आणि डार्क मेकअप या आऊटफिटला परिपूर्ण करत आहे. 

दिवाळी पार्टीसाठी शिल्पा शेट्टीचा वरील इंडो वेस्टर्न आऊटफिट हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात तिने शरारा, कटआउट टॉप आणि मॅचिंग दुपट्टा घेतला आहे, जो लूक पूर्ण करतो. तुम्हीही असे काहीतरी परिधान करून पारंपारिक पण आधुनिक लूक मिळवू शकता. या आऊटफिटसह तुम्ही ऑफीस पार्टीमध्ये आकर्षक दिसलं हे नक्की. 

ऑफिस पार्टीमध्ये माधुरी दीक्षितने बेज आणि गोल्डन कलरचा इंडो-वेस्टर्न आउटफिट परिधान केला आहे. ज्यामध्ये प्लेटेड स्कर्ट आणि ब्लेझर-स्टाईल टॉप दिसत आहे. माधुरीने तिचा लूक क्लासिक हेअरस्टाईल आणि लॉन्ग इयरिंग्ससह पूर्ण केला आहे. 

जर तुम्ही दिवाळी पार्टीसाठी साडी नेसत असाल तर तुम्ही ती मॉडर्न टचने स्टाईल करा. जसे, वरील फोटोमध्ये करिश्मा कपूरने सोनेरी मिरर वर्क असलेली बेज रंगाची साडी घातली आहे. अभिनेत्रीने ही साडी जॅकेटसोबत नेसली आहे. करिश्मा तिच्या आकर्षक स्ट्रेट हेअरस्टाइलने अगदी सुंदर दिसत आहे.