आई गं...! पिरेड्समध्ये वर्कआऊट करणे सेफ आहे का? प्रश्न एक उत्तर अनेक


मुली आणि महिलांना दर महिन्याला पिरेड्स येणे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेदरम्यान, अनेक प्रकारच्या मुलींना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जसे की, मूड स्विंग, थकवा, पोट आणि पाठदुखी इ. सारख्या समस्या होणे, सामान्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत वेदना तीव्र असतात, ज्यामुळे महिलांनी विश्रांती घेणे, आवश्यक आहे. शारीरिक हालचाल अधिक केल्याने वेदना आणखी तीव्र होत जातात. मात्र, काही अशाही महिला ज्यांना नियमित व्यायाम करण्याचीची सवय असते. त्या वेदनांवर मात करून पिरेड्समध्ये व्यायाम करतात. 


पण प्रश्न असा आहे की, पिरेड्स सुरु असताना व्यायाम करणे सेफ आहे का? आणि जर ते योग्य आहे तर किती प्रमाणात सेफ आहे? तसेच, कोणते व्यायाम करावेत? या सर्व  प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत.

मासिक पाळीदरम्यान व्यायाम करणे योग्य आहे का? 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त तुमची ऊर्जा आणि शरीराचा आराम लक्षात ठेवून व्यायाम करणे, आवश्यक आहे. या काळात तुम्ही हाय इंटेन्स व्यायामाऐवजी हलके व्यायाम करू शकता. तसेच, जर तुम्हाला जास्त थकवा किंवा वेदना जाणवत असतील, तर शक्यतो व्यायाम करू नका. 

पिरेड्समध्ये कोणते व्यायाम करावे? 

वर सांगितल्याप्रमाणे, तज्ञांच्या मते मासिक पाळी दरम्यान हलके व्यायाम करणे, सर्वोत्तम आहे. पिरेड्सदरम्यान वॉकिंग, योगासने, स्ट्रेचिंग आणि मेडिटेशन हे व्यायामासाठी सर्वोत्तम पर्याय मानले जातात. यामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि पोट, पाठदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

महत्त्वाचे 

- तज्ज्ञ सांगतात की, मासिक पाळीच्या काळात तुम्ही जितके जास्त सक्रिय असता तितके तुमचे मन आणि शरीर शांत राहण्यास मदत मिळते.

- एखाद्या आवडत्या कामात तुमचे मन वळवून तुम्ही पिरेड्स क्रॅम्पवर कमी लक्ष केंद्रित करू शकता. 

- व्यायामामुळे एंडोर्फिन बाहेर पडतात, ज्यांना फील-गुड हार्मोन्स असेही म्हणतात. हे हार्मोन्स मूड स्विंग आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.

- लक्षात घ्या की, जर तुम्हाला जास्त ब्लीडींग, चक्कर येणे किंवा अशक्तपणा येत असेल तर व्यायाम न करणे योग्य ठरेल. या काळात तुमच्या शरीराला शक्य तितकी विश्रांती द्या.

थोडक्यात सांगायचे झाल्यास, मासिक पाळीच्या काळात व्यायाम करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. या काळात, तुम्ही तुमच्या क्षमतेची आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

टीप: वरील सर्व माहिती केवळ तुमच्या सामान्य ज्ञानाकरिता आहे. या माहितीचा दैनंदिन जीवनात अवलंब करायचा असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

image credit: pexels