Overthinking: स्वतःचेच वैरी! नक्की काय असते ओव्हरीथिंकींग? या समस्येवर मात कसे करावे?


Overthinking आजकालच्या जगात सतत वाढत जाणारी समस्या बनली आहे. एकदा लोक पैसे कमवण्याच्या सवयीत अडकले की ते अतिविचार करू लागतात. यालाच वैज्ञानिकदृष्ट्या ओव्हरीथिंकींग असे म्हणतात. बरेचदा लोक हलक्यात जास्त विचार करण्याची चूक करतात. हा एक सापळा आहे, ज्यामुळे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे अगदी स्वतःचा नाश देखील होऊ शकतो. जास्त विचार करण्याचे एक कारण म्हणजे आजकालचे आपले व्यस्त जीवन होय. 


तुम्हाला कसे जीवन हवे? तुमचे करिअर कसे असेल? लग्नानंतर मुले झाली तर तुमचे भविष्य कसे असेल... असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात रेंगाळत असतात. तुम्ही निष्क्रिय असाल किंवा व्यस्त असाल, काही ना काहीतरी तुमच्या मनात सतत येत असते. खरंच, काही लोक सतत तणावात असतात. या प्रक्रियेला आपण ओव्हरथिंकींग म्हणतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात ओव्हरीथिंकींग म्हणजे काय? यावर मत करण्याचे विशेष उपाय. 

ओव्हरीथिंकींग म्हणजे नक्की काय? 

छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचे मन थकते का? झोप न लागणे किंवा सतत अस्वस्थ वाटणे ही सर्व तुम्ही जास्त विचार करण्याने ग्रस्त असल्याचे लक्षण आहेत. हा एक प्रकारचा आजार आहे, जो केवळ आपले मन थकवत नाही तर हळूहळू आपल्या मानसिक आरोग्यालाही हानी पोहोचवत असतो.


लक्षात घ्या की, जेव्हा असे होते तेव्हा नातेसंबंध आणि इतरत्र निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. जेव्हा एखादी व्यक्ती भूतकाळातील घटनांना पुन्हा आठवते, भविष्याबद्दल जास्त काळजी करते आणि प्रत्येक निर्णयात "जर आणि पण" आणते तेव्हा ते सूचित करते की, ती व्यक्ती ओव्हरीथिंकींगच्या समस्येने ग्रस्त आहे. एवढेच नाही तर, ओव्हरीथिंकींगमुळे केवळ ताणतणावच नाही तर चिंता, निद्रानाश, फोकस, नातेसंबंधांमध्ये गैरसमज आणि आत्मविश्वास कमी होणे अशा समस्या देखील उद्भवतात. जर ही समस्या नियंत्रित केली नाही तर व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. 

ओव्हरीथिंकींगवर मात कशी करायची? 

विचार करण्याची वेळ मर्यादा

दिवसभर विचार करत बसू नका, त्यासाठी एक वेळ निश्चित करा. स्वतःला वचन द्या की, तुम्ही दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटांच्यावर विचार करणार नाही. फक्त याच काळात ताण घ्या आणि वेळ संपल्यानंतर स्वतःला सांगा, 'बस्स झालं!' असे केल्याने तुमचे मन स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

तुमच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टी सोडून द्या.

सर्वकाही तुमच्या नियंत्रणाखाली असणे आवश्यक नाही. स्वतःला विचारा, "मी जे विचार करत आहे ते माझ्या नियंत्रणात आहे का? जर नसेल, तर त्यावर ऊर्जा वाया घालवणे कितपत योग्य आहे?". शिवाय तुम्ही काय बदलू शकता, यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमचे मन शांत होईल.

फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा. 

निष्क्रिय मन हे सैतानाचे काम आहे. म्हणून स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. चालणे, जिममध्ये जाणे किंवा हलके व्यायाम करणे यासारख्या शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त रहा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर बागकाम किंवा घरातील कामे करा. त्याबरोबरच नेहमी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा.  जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर उत्तमच आहे. जमेल तर बाहेर जाऊन वेगवेगळे पदार्थ ट्राय करा. असे म्हणतात की, शारीरिकदृष्ट्या बळकट लोकांमध्ये इतरांपेक्षा जास्त आत्मविश्वास असतो. विशेषतः मी स्वतः नृत्यामध्ये स्वतःला मग्न ठेवण्याचे आणि माझ्या कलेचे संपूर्ण आस्वाद घेण्याचे प्रयत्न करत असते. 


वर्तमानात जगायला शिका. 

आपण भूतकाळ बदलू शकत नाही आणि पुढे काय होणार आहे ते सुद्धा पाहू शकत नाही. म्हणून, सध्याच्या क्षणात जगण्याचा प्रयत्न करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि आजचा आनंद कसा घेऊ शकता याचा विचार करा. ही वेळ परत येणार नाही, त्यामुळे या वेळेला दुःखात न घालवता एन्जॉय कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करा. काही दिवसांतच तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील.

लिहिण्याची सवय 

खूप कमी लोक लिहिण्याची सवय ठेवतात. खरं तर, त्यांच्या मोबाईल फोनवर रील्स पाहण्यात वेळ वाया घालवू शकतात, परंतु त्यांच्या मनात काय आहे ते कागदावर उतरवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. तुमच्या मनात असलेले विचार लिहायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या मनाला मोकळे होण्याचा मार्ग देखील मिळेल. 

image credit: pexels