गुढी पाडवा विशेष : जाणून घ्या, सणाचे महत्त्व आणि रंजक इतिहास...

गुढी पाडवा हा सण प्रामुख्याने मराठी समाजात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण भारतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात या सणाला उगादी, छेटी चंद अशा अनेक नावांनी ओळखले जाते. गुढी पाडवा हे नाव दोन शब्दांपासून बनले आहे - 'गुढी', ज्याचा अर्थ ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा चिन्ह आणि 'पाडवा' म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस. त्याबरोबरच गुढीपाडव्यात 'गुढी' या शब्दाचा अर्थ 'विजय ध्वज' असाही होतो आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी होय. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी आपले घर सजवून गुढी उभारल्याने घरात सुख-समृद्धी येते. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक देखील मानले जाते.

महत्त्व आणि इतिहास : 

गुढीपाडवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. अनेक ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. त्याबरोबरच या दिवशी विश्वाचा निर्माता ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, असे देखील मानले जाते. एका मान्यतेनुसार सतयुगाची सुरुवातही याच दिवसापासून झाली. दरम्यान, महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याचे कारण म्हणजे मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धातील विजय होय. असे मानले जाते की, त्यांनी युद्धात विजय मिळवल्यानंतर गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाऊ लागला. 

हिंदू पौराणिक कथेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली, असे मानले जाते. त्याबरोबरच या दिवशी ब्रह्माजींनी दिवस, आठवडे, महिने आणि वर्षांची ओळख करून दिली, असे देखील सांगितले जाते. हा सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याला ब्रम्हदेवाची पूजा करण्याच्या नियम आहे. तसेच या दिवशी भगवान श्रीराम विजय मिळवून अयोध्येत परतले. त्यामुळे गुढी-पाडवा हा सण विजयोत्सवाचे प्रतीक आहे, अशी कथा प्रचलित आहे.  


Previous Post Next Post