केसांचं लुक बदलण्यासाठी हेअर रिबॉण्डिंग सध्या ट्रेंडी झाले आहे. या प्रक्रियेला सामोरे जाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे...
हेअर रिबॉण्डिंग प्रक्रिया:
केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करून हेअर रिबॉण्डिंग प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया केस स्ट्रेट, हलके आणि पातळ करण्याची आहे. आपले केस प्रोटिन्सने बनलेले असतात, जे डाइसफ्लाईड बॉण्डने जुळलेले असतात.ज्यामुळे केसांची रचना सरळ किंवा कुरळे केस अशी तयार होते. हेअर रीबॉन्डिंग एक तंत्र आहे ज्याद्वारे नैसर्गिकरित्या विकसित केसांना नवीन रचना दिली जाते. हेअर रिबॉण्डिंगसाठी स्टायलिस्ट आधी नीटपणे केस धुतात आणि चांगले वाळवतात. त्यानंतर ब्लो ड्राय आणि हेअर डायचा वापर करून ही ट्रीटमेंट केली जाते. या प्रक्रियेत ब्लो ड्रायर, स्टीमर, शाम्पू, आयर्न रॉड आणि न्यूट्रलायझर मशीन या उपकरणांचा वापर केला जातो.
हेअर रिबॉण्डिंगचे प्रमुख फायदे:
- रिबॉण्डिंगने केस स्ट्रेट होतात.
- केसांना अधिक काळापर्यंत स्ट्रेट ठेवण्याकरता उपयुक्त.
-हेअर रिबॉण्डिंगनंतर केस मुलायम आणि शाईनी दिसतात.
-रिबॉण्डिंगनंतर केसांच्या स्टाईलला सहजरित्या बदलता येते.
हेअर रिबॉण्डिंग करण्याचे साइड इफेक्ट्स:
केसांच्या रिबॉण्डिंगमध्ये बऱ्याच प्रकारचे रासायन वापरले जातात, ज्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील होतात. जसे केस तुटणे, ड्राय होणे यांसारखे नुकसान होतात.
- या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे स्काल्पला हानि होऊ शकते.
- संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांना या प्रक्रियेमुळे एलर्जी होऊ शकते.
-काही अभ्यासक असे सुद्धा म्हणतात की, हेअर रिबॉण्डिंग ट्रीटमेंट नेहमी केल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
- हेअर रिबॉण्डिंग प्रत्येक प्रकारच्या केसांकरता उपयुक्त मानली जात नाही. ही ट्रीटमेंट करण्याआधी डॉक्टरकडून सल्ला नेहमी घ्यावा.
हेअर रिबॉण्डिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या म्हणजे-
- केसांच्या रिबॉण्डिंग आधी कॉस्मोपॉलिटोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्यावा.
- ही ट्रीटमेन्ट रसायनयुक्त असते म्हणून ज त्वचेकरता हानिकारक असतात. म्हणून रिबॉण्डिंग करण्याआधी एलर्जी टेस्ट नक्की करून घ्यावी.
- केसांच्या संरचनेनुसार शाम्पू करणे.
- नट्स आणि स्प्राऊट्सयुक्त आहार घेणे.
- ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर साधारणतः एक आठ्वड्यापर्यंत केस बांधू नये.
हेअर रिबॉण्डिंगनंतर खालीलप्रमाणे आपल्या केसांची काळजी घ्या :
हेअर रिबॉण्डिंगनंतर केसांची योग्यप्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. याच्या दुष्परिणामांपासून वाचण्याकरिता आणि केसांना सुरक्षित ठेवण्याकरिता या गोष्टींची काळजी घ्या.
- हेअर रिबॉण्डिंगनंतर केसांना पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नका. अंघोळीदरम्यान वॉटरप्रूफ कॅपचा वापर करा. ट्रीटमेंटनंतर कमीतकमी तीन दिवस तरी केस पाण्याच्या संपर्कात येता कामा नये.
- रिबॉण्डिंगनंतर केसांवर क्लिप, रबरबँड, जुडा क्लिप इ. गोष्टी वापरू नका. यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते.
- रिबॉन्डेड केसांना ऊन आणि धळीच्या संपर्कात येऊ देऊ नका. उन्हामध्ये केस अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे खराब होऊ शकतात. घरातून बाहेर निघणे आवश्यक असेल तर केसांवर सिरम नक्की लावा आणि जाण्याआधी केस झाकून घ्या.
- रिबॉण्डिंगनंतर तीन-चार दिवसांनी केस धुण्यासाठी रसायन मुक्त शाम्पू आणि कण्डिशनरचा वापर करा.
- रिबॉण्डिंग नंतर काही कालावधीपर्यंत केसांना कलर करू नका. कलरमध्ये असलेले रसायन केसांना खराब करू शकतात.
- रिबॉण्डिंगनंतर काही कालावधीपर्यंत केस थंड्या पाण्यानेच धून घ्या. रिबॉण्डिंगनंतर कोमट किंवा गरम पाण्याने केस धुण्याचा सल्ला दिला जात नाही.
- रिबॉण्डिंग नंतर स्कॅल्पला स्वच्छ ठेवायला हवे.
- नेहमी नेहमी हेअर रिबॉण्डिंग ट्रीटमेंट करू नये. कारण ट्रीटमेंटमध्ये वापरले जाणारे रसायन केसांसाठी हानिकारक असतात.